अमरावतीत ‘डिजिटल व्हिलेज’ आहे की ‘डस्ट व्हिलेज’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:55 PM2017-11-16T12:55:26+5:302017-11-16T12:58:38+5:30

अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा आकस्मिक दौरा केला. येथील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नसल्याचे त्यांना आढळले.

Is 'Digital Village' or 'Dish Village' in Amravati? | अमरावतीत ‘डिजिटल व्हिलेज’ आहे की ‘डस्ट व्हिलेज’ ?

अमरावतीत ‘डिजिटल व्हिलेज’ आहे की ‘डस्ट व्हिलेज’ ?

Next
ठळक मुद्देआय सेंटर, पॉस मशीन बंदमेळघाटला अतिरिक्त जिल्हाधिकाºयांची आकस्मिक भेट

श्यामकांत पाण्डेय ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा आकस्मिक दौरा केला. येथील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नसल्याचे त्यांना आढळले.
‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. यानंतर अधिकाऱ्यांनी सावरासावर करण्यासाठी माहिती अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तेथे भेट दिली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या गाडीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत हरिसालपर्यंतचा प्रवास केला. येथील प्रकल्पांची माहिती घेतली.
हरिसालमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आॅनलाइन सेवा देणारे कंटेनर बंद होते. तसेच सीटीसी व आय सेंटर एकाच ठिकाणी असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. आय केअर सेंटरसाठी आणलेली मशीन धूळ खात असल्याने त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना बोलावले. मात्र प्रभारी चिखलदरा येथे शासकीय कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. येथील डॉ. प्रियंका कंटाळे यांनी आय केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन ई-लर्निंगची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.


तपासणी झाली, औषधे मिळाली नाही
परदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला रुग्णांशी संवाद साधला. त्यांची तपासणी झाल्याचे सांगितले. मात्र ढाकणा येथील जमुना मनोज धांडे या महिलेने औषध मिळाले नाही, अशी तक्रार करताच अतिरिक्त जिल्हाधिकारी अवाक् झाले. त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते.


येथील नेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने पॉस मशीनचा लाभ मिळत नाही. अनेक प्रयत्नानंतरही मशीन दुरुस्त झाली नाही. यामुळे आॅनलाईन व्यवहार करावे तरी कसे. - सईद खान, व्यावसायिक, हरिसाल


हरिसालमध्ये यंत्रणा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. यात सुधारणा करण्याची गरज आहे. संबंधित सर्व विभागांना माहिती देण्यात येईल.
- खुशालसिंग परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अमरावती

Web Title: Is 'Digital Village' or 'Dish Village' in Amravati?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :digitalडिजिटल