सरोज चौकातील जीर्ण इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:32+5:302021-04-08T04:14:32+5:30
अमरावती : सरोज चौक स्थित हनुमान मंदिराजवळील बन्सीलाल निवासच्या बाजूला राजकुमार गुप्ता आणि नंदलाल गुप्ता यांचे जुने घर आहे. ...
अमरावती : सरोज चौक स्थित हनुमान मंदिराजवळील बन्सीलाल निवासच्या बाजूला राजकुमार गुप्ता आणि नंदलाल गुप्ता यांचे जुने घर आहे. ती इमारत आता जीर्ण अवस्थेत असून, इमारतीच्या पुढील भागात सहा व्यावसायिकांची दुकाने आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास जीर्ण इमारतीतील बंद दुकानासमोर यश संजय श्रीवास (२१ रा. सरोज चौक) आणि त्याचा मित्र शुभम राठोड (२० रा. गाडगेनगर) हे दोघे गप्पा मारत बसले होते. दरम्यान त्यांच्या अंगावर इमारतीमधील धूळ पडली आणि इमारतीत कंपन होत असल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहून ते दोघेही इमारतीपासून दूर गेले. त्याचवेळी ती इमारत खाली कोसळली. रात्रीच्या काळोळात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने काय झाले अन काय नाही, हे दोघांनाही कळलेच नाही. परंतु काही वेळातच इमारत जमिनदोस्त झाल्याचे दोघांनाही दिसले.
बॉक्स:
इमारतीत होती सहा व्यवसायिकांची दुकाने
गुप्ता यांच्या इमारतीत सहा व्यवसायीकांची दुकाने होती. त्यामध्ये सुरेश तिवारी यांचे तिवारी पेन्टरचे दुकान, अरुण पंत यांचे पंत टेलरचे दुकान, भुषण चव्हाण यांचे चव्हाण स्पीकर्स नावाचे दुकान, गोटे टेलर,अनुपम रुपराव यांचे चहा कॅन्टींग आणि वेदांत साठे यांचे पेन्टरचे दुकानाचा समावेश आहे. रात्रीच्या वेळेत ही सर्व दुकाने बंद असल्यामुळे जिवीतहानी टळली. परंतु या दुकानदारांच्या दुकानातील सर्व साहित्य इमारतीखाली दबल्या गेले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.