थेट कंपनीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:59 PM2018-03-14T22:59:17+5:302018-03-14T22:59:17+5:30
शेतकऱ्यांच्या शाश्वत उपन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषिसमृद्धीद्वारा बागायती शेतकऱ्यांना खरिपासाठी हळदीचा पर्याय उपलब्ध केला. शेतकरी उत्पादक ते थेट कंपनी या साखळीचा अवलंब करीत मंगळवारी २० टनाचा पहिला ट्रक रवाना झाला.
अमरावती : शेतकऱ्यांच्या शाश्वत उपन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषिसमृद्धीद्वारा बागायती शेतकऱ्यांना खरिपासाठी हळदीचा पर्याय उपलब्ध केला. शेतकरी उत्पादक ते थेट कंपनी या साखळीचा अवलंब करीत मंगळवारी २० टनाचा पहिला ट्रक रवाना झाला. यासाठी येणारा ५० टक्के वाहतूक खर्च जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘केम’ प्रकल्पातून उपलब्ध केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
खरीप २०१७ मध्ये सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीवर बोंड अळीचा अटॅक झाल्याने हातचे पीक गेले. कृषी विभागाद्वारा पर्यायी पिकाची शिफारस नाही. अशा परिस्थितीत अचलपूर तालुक्यात कृषिसमृद्धी या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांनी ‘सेलम’ या हळदीच्या वाणाची लागवड केली, हळदीला फारसे खत वा कीटकनाशकांची आवश्यकता नसल्याने उत्पादन खर्चदेखील कमी आला.
दरम्यान, जळगाव तेथील एका उत्पादक कंपनीद्वारा या शेतकरी कंपनीशी करार झाला. या उद्योगाला रोज १०० टन हळद हवी असते. खासगी बाजारात १० ते ११ रुपये प्रतिकिलो अशी मागणी असताना शेतकºयांशी १२ रूपये किलो या भावाने करार करण्यात आला. मंगळवारी शेतकरी उत्पादकांचा पहिला हळदीचा २० टनाचा ट्रक जळगावला रवाना झाला. अचलपूर येथील तहसीलदार निर्भय जैन यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यासाठी येणाºया वाहतुक खर्चासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी कृषिसमुद्धी प्रकल्पामधून ५० टक्के निधी देण्याची सहमती दर्र्शविल्यामुळे शेतकºयांच्या वाहतूक खर्चात बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
ओल्या हळदीला १२ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. या हळदीवर प्रोसेसिंग करण्याची गरज नाही. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने यापासून पे्ररणा घेऊन आणखी शेतकरी समोर येतील. वाहतूक खर्चासाठी ‘केम’मधूून ५० टक्क्यांची तरतूद करण्यात आली.
- अभिजित बांगर
जिल्हाधिकारी