जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांगांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:14+5:302021-01-21T04:13:14+5:30
निवेदन : न्याय देण्याची मागणी अमरावती : दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या नवीन कायद्यानुसार दिव्यांगांचे ७ वरून २१ ...
निवेदन : न्याय देण्याची मागणी
अमरावती : दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ च्या नवीन कायद्यानुसार दिव्यांगांचे ७ वरून २१ प्रवर्ग समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्यानुसार आवश्यक प्रमाणपत्र दिले जात नसल्याने बुधवारी दिव्यांगांनी जिल्हा सामान्य रुग्णालयावर धडक देत मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना देऊन न्यायाची मागणी केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी केली जाते. परंतु कर्णबधिर, सिकलसेल व नवीन आजारांना २०१६ च्या कायद्यानुसार नव्या प्रवर्गात समाविष्ट केले आहेत. मात्र, याबाबत दिव्यांगांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्रापासुन वंचित राहत असून आपल्या स्तरावरून नवीन आजारग्रस्त अपंगांसाठी नियमावलीचे मार्गदर्शक फलक तयार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात लावण्यात यावे, अशी मागणी दिव्यांगांनी निवेदनाव्दारे शल्य चिकित्सकाकडे केली. यावेळी शेख बबू, मयूर मेश्राम, अन्वर शाह, राजिक शाह, किशोर मानेकर, रणजित थूल, शेख रुस्तम, शंकर वागपांजार, मोहम्मद राजिक. वर्षा खयेकर. राजिक शहा आदीचा सहभाग होता.