मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचे अपंगत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:14+5:302021-06-21T04:10:14+5:30

धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात आदिवासी बांधवांच्या आरोग्य सेवेकरिता सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय ...

Disability of vacancies in the health system in Melghat | मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचे अपंगत्व

मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदांचे अपंगत्व

Next

धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात आदिवासी बांधवांच्या आरोग्य सेवेकरिता सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे; परंतु तेथे आरोग्य सेवा देण्याकरिता मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे पाहिजे तशी आरोग्य सेवा रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव स्वतःच्या घरी तर भुमका पडीहार यांच्याकडे जाऊन आजारावर उपचार घेतात तर काही ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध असतानासुद्धा आदिवासी बांधवांचा विश्वास नसल्यामुळे ते आरोग्य सेवा नाकारतात. मग त्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागतो. याला जबाबदार मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला लागलेले रिक्त पदाचे असल्याचे बोलल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यात १५१ गावातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या सुविधेकरिता बैरागड बिजुधावडी कळमखार हरीसाल धुळघाट रेल्वे साद्राबाडी या सहा ठिकाणी प्रत्येकी सहा बेडचे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तर धारणी शहरात ५० बेडचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे तेथे आरोग्य सेवा देण्याकरिता मंजूर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर कर्मचारी यांची अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहे त्यामुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाहिजे तशी आरोग्य सेवा ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत नाही. सद्यस्थितीत भरारी पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णावर उपचार देणे सुरू आहे तर अतिदुर्गम क्षेत्रातील रंगूबेली, कुंड, खामंदा, किन्हीखेडा या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्याकडून आरोग्य सेवा देणे सुरू आहे. तेथील रुग्णाची प्रकृती जास्तच खराब झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कसरत करतच तेथे जावे लागते. ही परिस्थिती मागील दहा वर्षात बदलली नसून आजही तशीच आहे यामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य यंत्रणेवर परिपूर्ण विश्वास नाही त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधव त्याची प्रकृती बिघडल्यास स्वत: घरी किंवा परिसरातील भूमका, पंडिहार यांचा आश्रय घेऊन उपचार घेतात. मग त्यातून काहींना जीवदेखील गमवावा लागतो. तर काही वेळा आरोग्य यंत्रणा त्यांना पंडिहार, भूमका यांच्याकडे न जाता उपचार घरी व गावात देण्यास तयार असतानासुद्धा आदिवासी बांधव घेण्यास तयार नसतात. मग अशावेळी त्यांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याकरिता प्रकल्प अधिकरी पोलीस, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचीदेखील मदत घ्यावी लागते. याला मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदाचे अपंगत्व जबाबदार असल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. हे अपंगत्व दूर करायचे असेल तर रिक्त पदे भरणे तेवढेच गरजेचे आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे

वैद्ययकीय अधिकारी गट अ - २ पदे

वैद्यकीय अधिकारी गट ब - ४ पदे

मानसेवी वैद्यकीय अधिकारी २ पदे

आयुष वैद्यकीय अधिकारी २ पदे

औषध निर्माण अधिकारी २ पदे

आरोग्य सहायक स्त्री ६ पदे

आरोग्य सहायक पुरुष जीप ४ पदे

आरोग्य सहायक पुरुष राज्य ७ पदे

आरोग्य सेविका १० पदे

आरोग्य सेवक जीप २ पदे

आरोग्य सेवक राज्य ९ पदे

कनिष्ठ सहायक १० पदे

परिचर ९ पदे

कंत्राटी आरोग्य सेविका १० पदे

अशी एकूण ७८ पदे रिक्त आहे यातील जास्तीत जास्त रिक्त पदे अतिदुर्गम भागातील आहे. ती भरल्यास मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचे अपंगत्व नक्कीच कमी होणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात हे भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी देत आहे आरोग्य सेवा

तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरारी पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सेवा देणे सुरू आहे. त्यामध्ये हरीसाल येथे वैद्यकीय अधिकारी मोनिका कोकाटे, धमानंद सरदार, बैरागड येथे वैद्यकीय अधिकारी प्रमोद डवगे, धुळघाट रेल्वे येथे वैद्यकीय अधिकारी बालाजी डुकरे, साद्राबाडी वैधकीय अधिकारी सागर वडस्कर, सुशील बीजधावडी येथे वैद्यकीय अधिकारी निनीश भालतिलक, जगदीश साबळे या वैद्यकीय तर कळमखार येथे वैद्यकीय अधिकारी अभिषेक इंगळे, राखी बरवट, किशोर राजपूत या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य सेवा देणे सुरू आहे. यांच्याकडे कोरोना लसीकरण व भरारी पथकाचीदेखली जबाबदारी असून यांना त्यांच्या कामाच्या २४ हजार रुपये इतक्या कमी पगारात अतिरिक्त दोन कामांचा बोझा सहन करत आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तालुका आरोग्य अधिकारी दोन महिन्यांपासून रजेवर

धारणीचे तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून रजेवर आहे. त्यांच्याकडे बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकरी नसल्यामुळे तेथील प्रभार होता. सध्या तेथे कोणी रुजू झाले नाही तर तालुका आरोग्य अधिकारी पदालासुद्धा प्रभारीचे ग्रहण मागील तीन वर्षांआधी लागले होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होणार असल्याने चित्र सध्या दिसून येत आहे.

बाईट

ग्रामीण भागात रिक्त पदे आहे; परंतु मागील वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी यांची पदे भरली असल्याने त्यांच्याकडून ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात जाऊन आरोग्य सेवा देणे सुरू आहे. काही अडचणी असल्यास आम्ही सर्वच तेथे जाऊन आरोग्य सेवा देत आहे.

जयश्री नवलाखे

प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी

धारणी

Web Title: Disability of vacancies in the health system in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.