अपंगांचा जिल्हा परिषदेत ठिय्या
By admin | Published: May 30, 2014 11:22 PM2014-05-30T23:22:49+5:302014-05-30T23:22:49+5:30
अमरावती : राज्य व केंद्र शासनामार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना आणि सवलतीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी अनिल भंडारी
अमरावती : राज्य व केंद्र शासनामार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना आणि सवलतीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी अनिल भंडारी यांच्या दालनात अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अंपग भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रमुख मागण्यामध्ये अपंग बेरोजगारांना बाजार गाळे वाटपाच्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविणारे तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणार्या वर्हा ग्रामपंचायत ग्रामसेवक संजय बडासे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत अपंगांसाठी तीन टक्के निधी ठेवण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात अंपगांसाठी १0 लाख रूपये राखीव ठेवण्यात यावे. आदी मागण्यांसाठी अपंग भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ठिय्या आंदोलन केले. शासनाकडून अपंगासाठी विविध योजना राबवीत असताना त्या प्रशासकीय अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप शिष्टमंडळाने केला. आंदोलनात शेख अनिस, राजीक शहा दिसबर शहा, गजानन इंगोले, जयकुमार रुपने, अब्दुल शहीद अब्दुल मजीद, स्वप्नील लोहकरे, शिवाजी अब्रुक यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)