भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणावरून वाढले मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:48+5:30
भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार स्थलांरणाची प्रक्रिया सुरू झाली. तहसील कार्यालयातील शासकीय दस्तावेज स्थलांतरणात खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावरून शनिवारी तहसील स्थलांतरण समर्थक व विरोधक आमसे सामने आले होते. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार टळला.
भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. दरम्यान शासकीय दस्तऐवज काही राजकीय पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहनात भरण्याचे काम केल्याची बाब अयोग्य ठरवून शासकीय दस्तऐवजांतील एखादे दस्तावेज गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न झेडपीचे बांधकाम सभापती जयंत देशमुख व भातकुली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, सुनील जुनघरे, सोपान गुडधे, अमरदीप तेलखडे, मंगेश वाहने, उमेश महिंगे, अजय देशमुख, मनोहर अग्रवाल, कैलास अवघड, अनिल बिरे, रोहित देशमुख, नीलेश सरवे जियाउद्दीन, वहीद, राजेश महल्ले यांनी तहसीलदारांना केला. त्यामुळे शासकीय साहित्य स्थलांतरण प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणाचाही सहभाग नसावा, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. श्रीकांत राठी, ब्रदीनाथ थोपसे, गणेश बांबल, विकास देशमुख, संजय चुनकीकर, जयकुमार रघुवंशी, बांबल गुरूजी, विजय पाचपोर, डॉ.पवार, सचिन सरोदे, गोपाल सोळंके, योगेश भट्टड, योगेश उमक, विशाल भट्टड, प्रमोद भोपसे आदींनी केली.
अमरावतीत भातकुलीचे तहसील कार्यालय हे तालुक्यातील अनेक गावांच्या सोईचे आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला. जनभावनेचा आदर करून तहसील कार्यालय येथे असणे गरजेचे आहे.
- जयंत देशमुख,
सभापती, बांधकाम जिल्हा परिषद
शासनाच्या अधिसूचनेनुसार तहसील कार्यालय स्थालांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने त्यांचे काम करावे. इतरांनी यात दबाब न आणता तहसीलचे काम भातकुली येथे सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.
- श्रीकांत राठी,
नागरिक