आपत्ती प्राधिकरणाची मान्सूनपूर्व रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:13+5:302021-05-31T04:10:13+5:30

अमरावती : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा मान्सूनपूर्व पूर रंगीत तालीम (मॉकड्रील) प्रशिक्षण कार्यक्रम वडाळी गार्डन पंचवटी राज्य राखीव ...

Disaster Authority's pre-monsoon color training | आपत्ती प्राधिकरणाची मान्सूनपूर्व रंगीत तालीम

आपत्ती प्राधिकरणाची मान्सूनपूर्व रंगीत तालीम

Next

अमरावती : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारा मान्सूनपूर्व पूर रंगीत तालीम (मॉकड्रील) प्रशिक्षण कार्यक्रम वडाळी गार्डन पंचवटी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात रविवारी करण्यात आले.

यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा शोध व बचाव पथकाचे उपप्रमुख नेवारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर उपस्थित होते. यावेळी पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचविणे, एखाद्या गावाला पुराने वेढा घातल्यास तेथील लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, वेगवेगळ्या उचल पद्धती झिप्रूच्या साह्याने पुराच्या पाण्यातून लोकांची सुटका करणे, याशिवाय अनेक प्रात्यक्षिक जिल्हा शोध बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सादर केले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या आदेशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. मान्सूनकाळात जिल्हा शोध व बचाव पथक तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याबाबतचा संदेश या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामध्ये हेमंत सरकटे, कौस्तुभ वैद्य, सचिन धरमकर, योगेश गाडगे, देवानंद भुजाडे, भूषण वैद्य, दीपक डोळस, उदय मोरे, अर्जुन सुंदरडे आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Disaster Authority's pre-monsoon color training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.