दर्यापूरच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:11 PM2019-08-05T22:11:46+5:302019-08-05T22:12:04+5:30

नगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेला नगराध्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षातील १२ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास दाखल करून घेण्याची विनंती प्रशासनाला केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Disbelief proposal against Daryapur city chief | दर्यापूरच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

दर्यापूरच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

Next
ठळक मुद्दे१२ नगरसेवकांची स्वाक्षरी : राजकीय वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेला नगराध्यक्ष जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षातील १२ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास दाखल करून घेण्याची विनंती प्रशासनाला केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल अविश्वास प्रस्तावाच्या निवेदनावर काँग्रेस, राँका व रिपाइंच्या नगरसेवकांचा समावेश असलेल्या दर्यापूर शहर विकास आघाडीच्या ११ व एक स्वीकृत अशा एकूण १२ नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत. नलिनी भारसाकळे या दर्यापूरच्या नगराध्यक्ष आहेत. तथापि अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी मनमानी कारभार चालविला असून पालिकेतील आर्थिक अनियमिततेला त्या जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
जिल्हाधिकाºयांनी पालिकेतील आर्थिक अनियमततेची चौकशी करावी व त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. यावेळी ३१२ पानांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. नगरपालिकेचे उपाध्यक्ष सागर गावंडे, गटनेता दिलीप चव्हाण, आरोग्य सभापती अनील बागडे, शिक्षण सभापती अमोल गहरवाल, महिला व बालकल्याण सभापती निलीमा पाखरे, शादत खाँ अत्ताउल्लाखाँ, इबादुल्लाशाहा अब्दुल्लाशाहा, राजकन्या चव्हाण, किरण गावंडे, ताजखातून अजिज उल्लाखान, प्रतिभा शेवणे, स्वीकृत नगरसेवक विक्रमसिंह परिहार यांच्या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षºया आहेत. दरम्यान सोमवरी निवेदन देतेवेळी जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, राकाँचे अरुण गावंडे, अनिल जळमकर उपस्थित होते.

कुठलीही अनियमितता नाही. गैरव्यवहारात आपण सहभागी होत नाही. पालिकेवर मुख्यधिकाºयांचे नियंत्रण आहे. सर्व कामकाज नियमाकूल सुरु आहे. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाऊ.
- नलिनी भारसाकळे,
नगराध्यक्ष, दर्यापूर

अडीच वर्षांत शहरात कुठलीही विकासकामे झाली नाहीत. मतदार आम्हावर प्रश्नांचा भडीमार करतात. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
- दिलीप चव्हाण, गटनेता दर्यापूर शहर विकास आघाडी

Web Title: Disbelief proposal against Daryapur city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.