बैठकीत चर्चेअंती सहमती
By admin | Published: February 21, 2016 12:11 AM2016-02-21T00:11:51+5:302016-02-21T00:11:51+5:30
यासंदर्भात शनिवारी पोलीस विभागाकडून पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेत्तृत्वात बैठक बोलावण्यात आली.
अमरावती : यासंदर्भात शनिवारी पोलीस विभागाकडून पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेत्तृत्वात बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये आरटीओ वाढेकर, नेवस्कर, बसस्थानक प्रमुख, आरपीएफ, सीआरपीएफचे अधिकारी व आॅटो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत चर्चेअंती आॅटोच्या प्री-पेड प्रवासी वाहतुकीला सहमती मिळाली असून अमरावती रेल्वेस्थानक, बडनेरा रेल्वे स्थानक व अमरावतीचे मध्यवर्ती बसस्थानक येथून प्री-पेड प्रवासी वाहतुकीला सर्व अधिकारी व आॅटो संघटनांनी सहमती दर्शविली. त्यानुसार आता आरटीओ विभागातर्फे २४ फेब्रुवारी रोजीला तांत्रिक सर्व्हे केला जाईल. यानंतर प्री-पेड प्रवासी वाहतुकीचे दर निश्चित करून तो अहवाल रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे मान्यतेकरिता पाठविला जाणार आहे. आरटीएच्या मान्यतेनंतर तीनही ठिकाणांवरून प्रिपेड वाहतुकीला सुरुवात केली जाईल. रेल्वे स्थानक व बसस्थानकावर प्री-पेड प्रवासी वाहतुकीचे दरफलक लावण्यात येणार आहे. आॅटोचालकांना प्रवाशांकडून पैसे घेणे अनिवार्य राहणार आहे.
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानक व अमरावती बसस्थानक येथून आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरू करण्यास सहमती मिळाली आहे. याबाबत आरटीओतर्फे तांत्रिक सर्व्हे करून त्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याकरिता आरटीएकडे पाठविले जाणार आहे.
- नितीन पवार, पोलीस उपायुक्त.