पोलीस-युवासेनेच्या वादात दहीहंडीवर विरजण

By admin | Published: September 7, 2015 12:26 AM2015-09-07T00:26:21+5:302015-09-07T00:26:21+5:30

स्थानिक जयस्तंभ चौकात युवासेनेच्यावतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आणि ऐन रंगात आलेली ही स्पर्धा रद्द करावी लागली.

Dishwarya in police-youth fight dispute | पोलीस-युवासेनेच्या वादात दहीहंडीवर विरजण

पोलीस-युवासेनेच्या वादात दहीहंडीवर विरजण

Next

प्रेक्षक बिथरले : डीजे तपासताना झाली बाचाबाची, रंगलेली स्पर्धा रद्द
अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकात युवासेनेच्यावतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आणि ऐन रंगात आलेली ही स्पर्धा रद्द करावी लागली. त्यामुळे दर्शकांचा हीरमोड झाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दहीहंडीत वाजविल्या जाणाऱ्या डीजेची तपासणी करताना पोलीस आणि आयोजकांचा रविवारी वाद झाला. पोलिसांनी ‘नो पार्किंग’मधील दुचाकी उचलल्याने त्यात भर पडली.
नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी पोलीस परवानगीनुसार जयस्तंभ चौकात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. सुरूवातीला अनाथ मुलांनी सलामी दिली. नियोजनानुसार स्पर्धा सुरु झाली. पाण्याचा मारा आणि डीजेच्या तालावर गोविंदा मनोरे रचत होते. प्रेक्षकही जल्लोष करीत होते. ुउत्साह शिगेला पोहोचला असतानाच अचानक ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने डीजेची तपासणी केली. आवाज ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्यामुळे पोलिसांनी डीजे बंद करण्याचे फर्मान सोडल्याचे युवासेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे वाद उद्भवला व दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आली.

बक्षिसाची रक्कम अनाथालयाला
युवासेनेने दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या चमूसाठी तीन बक्षिसे जाहीर केली होती. त्यामध्ये अनुक्रमे ५१ हजार, २१ हजार व ११ हजारांची तीन बक्षिसे देण्याचे ठरविले होते. मात्र, दहीहंडी स्पर्धेत विघ्न आल्यानंतर ही बक्षिसांची रक्कम अनाथालयाला दान करण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी दिली.

Web Title: Dishwarya in police-youth fight dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.