सीमेवरील वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत

By Admin | Published: February 7, 2015 12:08 AM2015-02-07T00:08:24+5:302015-02-07T00:08:24+5:30

शहराच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये अद्यापही बिबट्याची दशहत कायम आहे. मागील आठवड्यात दोन बिबट्यांनी म्हैस फस्त केल्याची बाब वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यात कैद केल्याचा घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत.

Dishy panic in the border areas | सीमेवरील वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत

सीमेवरील वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत

googlenewsNext

गणेश वासनिक अमरावती
अमरावती : शहराच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये अद्यापही बिबट्याची दशहत कायम आहे. मागील आठवड्यात दोन बिबट्यांनी म्हैस फस्त केल्याची बाब वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यात कैद केल्याचा घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत. अशातच उन्हाळ्यात जंगलात पाणीटंचाई भासल्यास हे बिबट शहराच्या दिशेने वाटचाल करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी वनविभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.
शहरालगत जंगल असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. मात्र काही दिवसांपासून बिबट्याने शहराच्या दिशेने वाटचाल सुरु केल्यामुळे वनविभागही हैराण झाला आहे. विशेषत: पोहरा, चिरोडीच्या जंगलातून शहराच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये शिकारीच्या शोधात हे बिबट येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ली जंगलात वन्यप्राण्यांना पिण्यास पाणी उपलब्ध असले तरी मे महिन्यात त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. हे गृहीत धरुनच वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याला प्रारंभ केला आहे.
बिबट्या दिसल्याची चर्चा सुरूच
अमरावती : बिबट्याचे वास्तव असलेल्या परिसरात पानवठ्याची काळजी घेण्याचे अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. बिबट व्यतिरिक्त अन्य वन्यप्राण्यांना जंगलातच त्यांचे खाद्य उपलब्ध व्हावे, त्यानुसार उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. बिबट हा शिकारीच्या शोधात शहराच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे गृहीत धरुनच वनविभाग कामाला लागला आहे. मागील तीन दिवसांपुर्वी बिबट्याने महिलावर हल्ला केल्याची चर्चा दिवसभर चालली. या चर्चेमुळे सोमवारी अधिकाऱ्यांनी पोहरा जंगल पिंजून काढले. मात्र बिबट्याने काणत्याही महिलेवर हल्ला केला नाही ही केवळ अफवा होतीे. प्रभात भ्रमंती करणाऱ्या अनेकांनी बिबट बघितल्याचे बोलले जाते.बिबट बघितल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना नागरिकांनी सूचना दिल्यानंतरही उपाययोजना आखल्या जात नाही, असा वनविभागाचा कारभार सुरु आहे. उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच बिबट शहराच्या सीमेवर दस्तक देत असतील तर येत्या काळात पाणी, शिकारीसाठी बिबट्यांच्या हैदोसाची काय परिस्थिती राहिल? हा विचार करण्याचा प्रसंग उद्भवला आहे.

Web Title: Dishy panic in the border areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.