वनजमिनीवर ‘त्या’ खोदकामाबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

By admin | Published: November 15, 2016 12:12 AM2016-11-15T00:12:32+5:302016-11-15T00:12:32+5:30

बडनेरा वनवर्तुळांतर्गत सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकले असताना...

Disillusionment among the officials about the 'dhog' | वनजमिनीवर ‘त्या’ खोदकामाबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

वनजमिनीवर ‘त्या’ खोदकामाबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

Next

सर्वेअरकडून होणार मोजणी : वनगुन्हे दाखल नंतर चौकशी अहवाल नाही
अमरावती : बडनेरा वनवर्तुळांतर्गत सालोड ते कारंजा मार्गावर वनजमिनींवर पोकलँडने भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकले असताना ते वनजमिनीवर टाकले अथवा नाही? हे शोधण्यासाठी वन विभाग भूमिअभिलेखच्या सर्वेअरकडून नव्याने मोजणी करणार आहे. तसे संकेत वनविभागाने दिले आहे. वनजमिनीवर खोदकाम झाल्याबाबत अधिकारी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.
वन अधिनियमानुसार वनजमिनीवर यंत्र अथवा मशीनद्वारे खोदकाम करता येत नाही. तरीदेखील खासगी कंपनीने वनजमिनीवर पाच कि. मी. पोकलँडने खोदकाम केल्याची बाब निदर्शनास आली. पोकलँडने वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वनगुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करता यावे, यासाठी आता भूमिअभिलेख विभागाच्या सर्वेअरकडून घटनास्थळाचे मोजमाप, खोदकाम झाल्याची जागा कुणाची आदी कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी वन विभाग सरसावला आहे. ३५ लाख रुपये किमतीचे पोकलँड ताब्यात घेऊन वनगुन्हे दाखल केल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना खोदकाम कोणत्या यंत्रणेच्या मालकीत झाले. याबाबत संभ्रम कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वनजमिनीवर पोकलँडने खोदकाम प्रकरणाचा तपास डीएफओच्या आदेशाने वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर होत नसल्याची माहिती आहे. आता वनजमिनीवर खोदकामाचे सर्वेअरकडून मोजणी केली जाणार असून त्यानंतरच चौकशी अहवालाचा मार्ग सुकर होईल, असे बोलले जात आहे. एकिकडे वनगुन्हे दाखल करून पोकलँड ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यानंतरही वनाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे वनजमिनीवर खोदकाम केल्याप्रकरणी उशिरा वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात कोणताही गैरप्रकार झाला नाही. खोदकाम झालेली जमीन ही कोणाच्या मालकीची हे तपासण्यासाठी शासकीय सर्वेअरकडून मोजणी केली जाईल. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात टिकावे, यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत.
- हरिश्चंद्र पडगव्हाणकर
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी

Web Title: Disillusionment among the officials about the 'dhog'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.