उपविभागीय अभियंत्याच्या कक्षात तोडफोड

By admin | Published: July 5, 2014 11:19 PM2014-07-05T23:19:46+5:302014-07-05T23:19:46+5:30

गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंताच्या कक्षात एका कंत्राटदाराच्या सुपरवायझरने तोडफोड केल्याने खळबळ उडाली होती.

Dismissal in sub-divisional engine room | उपविभागीय अभियंत्याच्या कक्षात तोडफोड

उपविभागीय अभियंत्याच्या कक्षात तोडफोड

Next

आरोपी पसार : सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंताच्या कक्षात एका कंत्राटदाराच्या सुपरवायझरने तोडफोड केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी खंडेलवाल कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर रोहित देशमुख (रा.साईनगर) व एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वलगाव येथील रोडच्या कामाचा कत्रांट खंडेलवाल कन्स्ट्रक्शनला दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्या रोडचे काम पूर्ण झाल्याने त्या रोडचे बिल काढण्याकरिता शनिवारी दुपारी २ वाजता सुपरवायझर रोहित देशमुख व त्यांचे एक साथीदार सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता एस.पी. देशमुख यांच्या कक्षात गेले. यावेळी रोडच्या कामात हयगय झाल्यावरुन एस.पी. देशमुख व रितेश देशमुख यांच्यामध्ये वादविवाद झाले. या वादातून रोहित देशमुख व त्यांच्या साथीदाराने उपविभागीय अभिंयता एस.पी. देशमुख यांच्या कक्षाची तोडफोड करणे सुरु केले. यामध्ये त्यांच्या कक्षातील टेबलावरील काचा, दार व शोकेसची तोडफोड केली. वाद वाढत असल्याचे पाहून याबाबत गाडगेनगर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रोहित देशमुख व त्यांच्या साथीदारांनी तेथून पलायन केले. काही वेळात पोलिसांनी पाचारण करुन काजी यांच्या कक्षाची पाहणी करुन पंचनामा केला व आरोपीविरुध्द भादंविच्या कलम १८६, ४५२, ४२७ व प्रॉपर्टी डॅमेज अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय चव्हाण करीत आहे.

Web Title: Dismissal in sub-divisional engine room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.