कचऱ्यात फेकलेल्या बालिकेची अमरावतीला रवानगी

By admin | Published: May 7, 2016 12:45 AM2016-05-07T00:45:59+5:302016-05-07T00:45:59+5:30

दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली.

Dismissing the child in the trash will be sent to Amravati | कचऱ्यात फेकलेल्या बालिकेची अमरावतीला रवानगी

कचऱ्यात फेकलेल्या बालिकेची अमरावतीला रवानगी

Next

माता-पित्याचा शोध नाही : दत्तक घेण्यासाठी अनेकांची तयारी
वरूड : दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली. अखेर त्या बेवारस नवजात बालिकेची अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे.
मुलगी घरात जन्म घेताच लक्ष्मीचे रुप समजले जाते. तरीही केवळ मुलाचा अट्टाहास करुन मुलीला गर्भातच मारण्याचा प्रकार शहरासह खेडयापाडयात सुरू असतो, तर वंशाच्या दिव्याकरिता प्रयत्नशील असणारी जोडपी आणि कुटुंबे अनेक आहेत. पंरतु मुलीच वंशाचा दिवा असल्याचे सिध्द होऊनही मुलीवर प्रेम करणारे फार थोडे आहेत. असाच प्रकार शहरातील शांकूतल विहारात ३० एप्रिलच्या रात्री उघडकीस आला.
तीन युवकांना रडण्याचा आवाज ऐकू आल्यावरून शोध घेतला असता एक गोरीगोमटी नवजात बालिका विव्हळत असताना दिसली. तिला बाल रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली. परंतु चार दिवसांचा अवधी लोटूनही पोलिसांना ते निर्दयी अभागी माता पिता अद्यापही गवसले नाहीत, हे ेआश्चर्य आहे.
बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण चौधरी आणि डॉ.समता चौधरी या दाम्पत्यांनी उपचार करून नवजात शिशूला सावध केले होते. परंतु पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून नवजात बालिकेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णलयामधील बालकल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले. स्त्री भ्रूणहत्येचे भूत अद्यापही समाजातील लोकांच्या डोक्यावर चढले असल्याचे पुन्हा या धटनेने सिध्द होते. केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून फेकण्यात आलेल्या त्या नवजात बालिकेला अंधाऱ्या रात्री कचऱ्यात फेकण्यात आल्याने हृदयाचा थरकाप उडविणारे वृत्त ऐकून अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. परंतु त्या युवकांनी धाडसामुळेचे तीच ेप्राण वाचले. पोटच्या गोळयाला कचऱ्यात फेकणारी ती अभागी माता कोण? याचा शोध अद्यापही सुरुच आहे. नवजात गोऱ्यागोमट्या बालिकेला दत्तक घेण्याकरिता तालुक्यातून शेकडो हात पुढे सरसावले आहे. (तालुका प्रतिनिधी)

‘त्या’ एक दिवसाच्या बालिकेला बेवारस फेकणाऱ्या माता-पित्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अद्यापही धागेदोरे गवसले नाहीत. सदर नवजात बालिका ही मध्य प्रदेशातील असावी, असा अंदाज आहे. परंतु सदर बालिकेच्या पालणपोषणाकरिता तिला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे बाल कल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले आहे. किमान सहा महिने तरी तिला दत्तक दिले जाणार नाही. तिच्या जन्मदात्यांचा शोध घेणे अनिवार्य आहे.
- अर्जुन ठोसरे, ठाणेदार.

Web Title: Dismissing the child in the trash will be sent to Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.