अंजनगावच्या बी टेनिवल जागेचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:58+5:302021-09-11T04:13:58+5:30

मनोहर मुरकुटे - अंजनगाव सुर्जी : शहरातील संगई शाळेजवळील मुख्य चौकातील १३८५.१८ चौरस मीटर जागेचा व्यवहार करताना दर्यापूर ...

Dispute over B Tenival land of Anjangaon in the Collector's office | अंजनगावच्या बी टेनिवल जागेचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

अंजनगावच्या बी टेनिवल जागेचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

Next

मनोहर मुरकुटे - अंजनगाव सुर्जी : शहरातील संगई शाळेजवळील मुख्य चौकातील १३८५.१८ चौरस मीटर जागेचा व्यवहार करताना दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयातून बी टेनिवल जागेच्या परवानगीचे खोटे दस्तावेज सादर केले व जागेचा फेरफार करून प्रशासनाची दिशाभूल करीत शासनाचा लाखोंचा महसूल बुडविल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात कुशल चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचे पत्रपरिषदेत सांगितले.

शहरातील संगई शाळा व रेल्वे स्टेशन चौकाजवळ शिट न.२१ नझूल प्लाॕॅट न.२४ मधील १३८५.१८ चौरस मीटर जागा असून, ही जागा सत्ता प्रकार बी मध्ये येते. ज्याच्या खरेदी-विक्रीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी असणे बंधनकारक आहे. तरीही या जागेची ३ नोव्हेंबर २०१५ रोजी खरेदी होऊन त्याची नोंद २४ ऑक्टोबर २०१६ व २४ फेब्रुवारी २०१६ ला उपविभागीय अधिकारी यांनी नंतर परवानगी दिल्याचे सांगितले. याच दस्तएवजाच्या आधारे भूमीअभीलेख कार्यालयात २८ जून २०१७ ला फेरपत्रक क्र. ७०३९ करून सतीश हरिवल्लभ पसारी, पंकज शंकरलाल राठी यांचे नावे नोंद करण्यात आले. नगरपरिषद अंजनगावनेसुद्धा त्याच आधारे नोंदही केली. परंतु कुशल चौधरी यांनी सदर जागेच्या खरेदीबाबत माहिती अधिकारात उपभिवागीय अधिकारी दर्यापूर यांच्या कार्यालयात त्या आदेशाची सत्यप्रत मागितली असता, असे कोणतेही प्रकरण त्यांच्या न्यायालयात रेकॉर्डला नोंद नसल्याचे कळविण्यात आले. कार्यालयाच्या अभिलेखात प्रकरण आढळून आले नसल्याचे सांगितले. यावर चौधरी यांनी पंकज नायडू यांनी टाकलेल्या राजस्व क्र.एम आर.सी ८१ अंजनगाव १९/१५-१६ आदेश तारीख २४ ऑक्टोबर २०१६ लिहिली आहे. या प्रकरणाची सत्यप्रत मागितली असता, हे प्रकरण वरूड बु. येथील, तर ८१ /अंजनगाव सुर्जी १९/१४-१५ हे प्रकरण साखरी येथील नोंदविल्याचे निदर्शनास आल्याने तसेच खरेदीनंतर काही काळाने परवानगी दाखवून पैशे शासन दरबारी भरल्याचे दाखवण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. त्यावरून हा व्यवहार संशयास्पद असल्याचे चौधरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यामुळे शहरात भूखंड माफीया व अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहेत हे उघड होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडे ह्या गंभीर प्रकाराबाबत तक्रार झाल्याने प्रशासनात व अंजनगाव शहरात खळबळ उडाली आहे. या भागातील बी टेनिवल जागेसंदर्भात दिलेली परवानगी तसेच लेआऊटबाबत मंजूर आदेश व परवानगी तपासणे गरजेचे आहे.

बॉक्स

चौकशीअंती मोठे घबाड समोर येणार

आरोपकर्त्याने हेतुपुरस्सरपणे आरोप केले असून, सर्वांगाने निराधार व शाशन निर्णयाचा अभ्यास न करता केलेले आहेत माझ्याकडे या प्रकरणाची सर्वयोग्य व खरी दस्तऐवज उपलब्ध असुन यात कोनतेही हेराफेरी नाही प्रशासनाकडुन आरोपकर्त्याला कोनत्या प्रकारची उलट सुलट माहीती पुरवली ते मला माहीत नाही व त्यास मी जवाबदार नाही असे पंकज श.राठी (जागामालक) यांनी सांगितले.

Web Title: Dispute over B Tenival land of Anjangaon in the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.