बेजबाबदार वक्तव्य करणाºया परिवहन मंत्र्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:19 PM2017-10-18T23:19:41+5:302017-10-18T23:20:02+5:30
एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. आ.रवी राणा यांनी गुरुवारी एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन कैफियत ऐकली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संपाबाबत केलेल्या बेजबाबदार व्यक्तव्याचा निषेध करून दिवाळीच्या दुसºया दिवशी ज्याप्रमाणे नरकासुराचे दहन होते, त्याप्रमाणे रावतेंचेही दहन करा, असे आवाहन त्यांनी संपकरी कर्मचाºयांना केले.
अमरावती व बडनेरा आगारात आ.राणा यांनी भेट देऊन प्रवासी आणि संपात सहभागी आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्यात. यावेळी एसटी कर्मचाºयांनी परिवहनमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी केली. एसटी कर्मचाºयांना तोकडे वेतन असल्याचे वास्तवदेखील आ. राणांनी जाणून घेतले. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसटी कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी संपकरी कामगारांना दिले. गत दोन दिवसांपासून एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध जाहीरपणे वक्तव्य करून दिवाकर रावते यांना परिवहन मंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरेने पदमुक्त व्हावे, अशी मागणी आ.राणांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी संपकरी कामगारांनी परिवहन मंत्र्यांविरुद्ध नारेबाजी करीत निषेध व्यक्त केला. विलास वाडेकर, शरद मालवीय, अजय जयस्वाल, नील निखार, नितीन सोळंखे, पवन भिंडा, रऊफ पटेल, मंगेश चव्हाणआदी उपस्थित होते.