८३९ ग्रामपंचायतीत साजरे होणार डिजिधन मेळावे
By admin | Published: April 14, 2017 12:11 AM2017-04-14T00:11:57+5:302017-04-14T00:11:57+5:30
डिजिधन प्रदान मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र डिजिधन मेळावे १४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींत आयोजित केले जाणार आहेत.
१४ एप्रिलचा मुहूर्त : नीती आयोगाकडून सूचना
अमरावती : डिजिधन प्रदान मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र डिजिधन मेळावे १४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींत आयोजित केले जाणार आहेत.
राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर येथे १४ एप्रिल रोजी सांयकाळी ४ वाजता डिजिधन मेळावा पार पडणार आहे. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर याबाबत मेळावे घेण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या नीती आयोगाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
या उपक्रमासाठी जिल्ह्याकरिता एक नोडल आॅफिसर (समन्वयक) नियुक्त करावा, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोखरहित, डिजिधन व्यवहाराची माहिती होणे व या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य व लघु कविता, संविधान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तसेच डिजिधन व्यवहारासंदर्भात स्पर्धा घेतली जाणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना लोकप्रतिनिधीच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. डिजिधन मेळाव्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून हा व्यवहार नागरिकांना फायदेशीर आहे.