रवी राणांच्या हस्ते रोजगारासाठी साधने वितरित
By admin | Published: May 4, 2016 12:34 AM2016-05-04T00:34:57+5:302016-05-04T00:34:57+5:30
आ.रवी राणा यांच्या पुढाकाराने गरजू, विधवा, परितक्त्या, बेरोजगार, अपंग, गरीब, अंधांना रोगजार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध साधने वितरित करण्यात आले.
अमरावती : आ.रवी राणा यांच्या पुढाकाराने गरजू, विधवा, परितक्त्या, बेरोजगार, अपंग, गरीब, अंधांना रोगजार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध साधने वितरित करण्यात आले.
यामध्ये गोरगरीब विधवा, परितक्त्या महिलांना ४३ शिलाई मशीन, युवा बेरोजगारांना ५७ चारचाकी लोटगाडीचे वाटप, १५ कटला रिक्षा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, १७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत, ७०० लहान मुलांना बॅट बॉलचे वापट, १५ हॉलीबॉल चमुला हॉलीबॉचे वाटप, गावागावांतील ३८ महिला भजन मंडळींना भजन साहित्य व साऊंड सिस्टीम चे वाटप, ३७ अपगांना तीनचाकी सायकलचे वाटप, ५५ कर्णबधिरांना कर्णयंत्राचे वाटप, ६५ गावात व्यायामशाळा अंतर्गत व्यायाम साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आ. रवि राणा म्हणाले जिल्ह्यामध्ये अनेक युवक बेरोजगार असून त्यांना रोजगाराची विशेष आवश्यकता आहे. तसेच अनेक गोरगरीब गरजू विधा महिला व परितक्त्या महिलांनासुद्धा आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करण्याकरिता रोजगाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)