मेळघाटचे अतिदुर्गम हतरू भागात २० हजार मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:11+5:302021-06-21T04:10:11+5:30

चिखलदरा : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून युवक काँग्रेसतर्फे मेळघाटातील अतिदुर्गम हतरू ...

Distribution of 20,000 masks in remote Hatru area of Melghat | मेळघाटचे अतिदुर्गम हतरू भागात २० हजार मास्कचे वाटप

मेळघाटचे अतिदुर्गम हतरू भागात २० हजार मास्कचे वाटप

Next

चिखलदरा : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून युवक काँग्रेसतर्फे मेळघाटातील अतिदुर्गम हतरू परिसरातील गावांमध्ये आदिवासींना २० हजार एन ९५ मास्क शनिवारपासून मोफत वितरित करण्यास सुरुवात झाली.

प्रदेश युवक काँग्रेस महासचिव राहुल येवले व हतरू जिल्हा परिषद सदस्य पूजा राहुल येवले यांच्या हस्ते दहेंद्री येथून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सरपंच संजू साकोम, उपसरपंच पुण्या काका येवले, रामप्रसाद पंडोले, चित्राम, दयाराम, साबूलाल, गणेश घुमावारे, कैलाश, गंगाराम भैय्या, संदीप मुंडे, संजू पोटे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

मेळघाटात जनजागृती

दुसऱ्या लाटेत कोरोनाने मेळघाटातील अतिदुर्गम भागातसुद्धा प्रवेश केला. त्यामुळे त्यासंदर्भात आदिवासींमध्ये मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे लसीकरण संदर्भातही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. आदिवासी आता त्यात सहकार्य करू लागले आहे.

कोट

मेळघाटातील अतिदुर्गम हतरू परिसरातसुद्धा कोरोनाने दुसऱ्या लाटेत प्रवेश केला. त्यामुळे आदिवासींमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविल्या जात आहे.

- राहुल येवले,

महासचिव, प्रदेश युवक काँग्रेस

===Photopath===

200621\img-20210619-wa0169.jpg

===Caption===

मेळघाटात 20000 मास्क चे वाटप

Web Title: Distribution of 20,000 masks in remote Hatru area of Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.