फिक्स पॉईंटवरील पोलिसांना एनर्जी ड्रिंक व खाद्य पदार्थांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:07+5:302021-03-06T04:13:07+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. आता तापमान वाढल्यामुळे उन्हापासून त्यांचे ...
अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे. आता तापमान वाढल्यामुळे उन्हापासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत मिळावी म्हणून त्यांना फिक्स पाईंटवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना एनर्जी ड्रिंक व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी राबविला. लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना एनर्जी ड्रिंक व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रत्येक पोलीस कर्मचारी तसेच अंमलदार यांनी फूड पॉकीटमध्ये, एक मिनरल वाटर बाटली, एक बिस्कीट पाकीट, मॅँगो ज्यूस, आलु भुजीया पाकीट, चिवडा नमकीन पाकीट, तसेच इतर खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या वाढत्या उन्हातही नाकाबंदी व फिक्स पॉईंटवर पोलीस कर्तव्य बजावत आहेत. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे पोलीस, होमगार्ड व सीआरपीएफच्या जवानांचा कर्तव्य बजावताना त्यांचा उत्साह वाढावा, त्यांना बंदोबस्तात मदत व्हावी म्हणून पोलीस उपायुक्त(मुख्यालय) विक्रम साळी यांच्या हस्ते एनर्जी ड्रिंक व खाद्यपदार्थ किटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले.