सारडा महाविद्यालयाकडून मोफत औषधी रोपे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:02+5:302021-09-05T04:17:02+5:30
अंजनगाव सुर्जी : स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचा वनस्पतिशास्त्र विभाग, केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, पश्चिम विभागीय ...
अंजनगाव सुर्जी : स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचा वनस्पतिशास्त्र विभाग, केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) व कार्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अभियान अंतर्गत औषधी वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने मोफत औषधी वनस्पती रोपवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे सहायक संचालक कोंडीराम धुमाळ होते. तालुका कृषि अधिकारी मनोहर कोरे, संस्थेचे कार्याध्यक्ष जगदीश सारडा, प्राचार्य वशिष्ठ चौबे, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख मंगेश डगवाल, संस्थेचे विश्वस्त डॉ. मधुसूदन सारडा, संजय सारडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये शेतकरी, डॉक्टर, पत्रकार, नागरिक तसेच पतंजली योग समितीचे सदस्य, लोकजागर संघटनचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन नवीता मालानी यांनी केले. आभार रामचंद्र कुळकर्णी यांनी मानले. औषधी वनस्पती वाटप कार्यक्रमाकरिता पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे विभागीय संचालक दिगांबर मोकाट यांचे विशेष सहकार्य लाभले.
केशव माकोडे, अंशुमती पेंडोखरे, महेंद्र गिरी, गोपाल बागडी, नितीन सराफ, जुगल मालधुरे, सुवर्णा झिलपे, ममता येवतकर, पवन राऊत, सतीश मार्डीकर, विवेक पाटील, संतोष सरोदे, प्रल्हाद लोयटे, विलास तायडे, सुनील कुऱ्हेकर, शिवनाथ इंगळे, रामू इटकरे यांचे सहकार्य लाभले. औषधी वनस्पती रोपटे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.