धामगावात २८४ शेतकऱ्यांना दीड कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:01+5:302021-05-30T04:12:01+5:30

एसबीआय कृषी शाखेचा पुढाकार 0 शाखा व्यवस्थापक स्वतःच देतात सातबाराची सेवा फोटो पी २९ धामणगाव धामणगाव रेल्वे : येथील ...

Distribution of peak loans of Rs 1.5 crore to 284 farmers in Dhamgaon | धामगावात २८४ शेतकऱ्यांना दीड कोटींचे पीककर्ज वाटप

धामगावात २८४ शेतकऱ्यांना दीड कोटींचे पीककर्ज वाटप

Next

एसबीआय कृषी शाखेचा पुढाकार 0

शाखा व्यवस्थापक स्वतःच देतात सातबाराची सेवा

फोटो पी २९ धामणगाव

धामणगाव रेल्वे : येथील भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेने कोरोनाकाळात तब्बल २८४ शेतकऱ्यांना १ कोटी ४५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे सेतू सेवा केंद्र बंद असल्याने शाखा व्यवस्थापकांनी स्वतः लिंकवरून सातबारा काढून शेतकऱ्यांना सेवा दिली आहे.

शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी खरीप हंगामाचे दिवस पाहता तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना बी-बियाण्यांसाठी आर्थिक मदत त्वरित व्हावी म्हणून स्वतः पीककर्ज वितरित करण्याची मोहीम युद्धस्तरावर राबविली. बँकेचे कर्मचारी अर्पित राक्षसकर, मुरलीधर कडू, राजेंद्र धनस्कर, राजू शहा, सीमा काटकर, रोशनी शाहू, पुंडलिक कुमरे, संजय दहातोंडे, महेश नक्षणे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोट

बँकेच्या पायऱ्या झिजविल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. खरीप हंगाम संपल्यानंतर काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. मात्र, एसबीआय कृषी विकास शाखेने खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मोठा आधार दिला.

- गिरीश देशमुख, शेतकरी,

सोनेगाव खर्डा

===Photopath===

290521\img_20210529_130128.jpg

===Caption===

शाखा व्यवस्थापक

Web Title: Distribution of peak loans of Rs 1.5 crore to 284 farmers in Dhamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.