चांदूर बाजारमध्ये गरजू कुटुंबीयांना रेशन कीटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:47+5:302021-05-27T04:12:47+5:30
रिलायन्स फाैंडेशन आणि संत सेनाजी महाराज संस्थेचे उपक्रम चांदूर बाजार : रिलायन्स फाैंडेशन आणि संत सेनाजी महाराज सामाजिक संस्था ...
रिलायन्स फाैंडेशन आणि संत सेनाजी महाराज संस्थेचे उपक्रम
चांदूर बाजार : रिलायन्स फाैंडेशन आणि संत सेनाजी महाराज सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू असलेल्या रेशन कीटचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात अडचणीत आलेले गरीब, बेरोजगार तसेच सलून व्यावसायिकांना रिलायन्स फाैंडेशन व संत सेनाजी महाराज संस्थेकडून रेशन कीटचे वाटप करण्यात आले. यासाठी रिलायन्स फाैंडेशनचे कार्यक्रम सहायक सुमीत मातीकाळे तसेच संत सेनाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मानेकर यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. गरजूंना या रेशन कीटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील सलून व्यावसायिक तसेच हातावर पोट असलेल्या गरीब कामगार, बेरोजगार, त्यांना मोठा फटका बसलेला आहे. या कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून या रेशन कीटचे वाटप करण्यात आले.
वाटप करताना रिलायन्स फाैंडेशनचे कार्यक्रम सहायक सुमीत मातीकाळे तसेच संत सेनाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मानेकरसह सदस्य आशिष राऊत, विनोद माथूरकर, अवि आसोलकर, नंदकुमार निंभोरकर, संजू लोणकर, राजेंद्र साऊरकर, नीलेश मानेकर यांच्या उपस्थितीत रेशन कीटचे वाटप करण्यात आले.