महाआवास योजनेतील तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:04 AM2021-08-02T04:04:49+5:302021-08-02T04:04:49+5:30

कॅप्शन - पुरस्कार स्वीकारताना सावनेरचे सरपंच धनराज इंगोले. नांदगाव खंडेश्वर : प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेत ...

Distribution of taluka level awards under Maha Awas Yojana | महाआवास योजनेतील तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण

महाआवास योजनेतील तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण

Next

कॅप्शन - पुरस्कार स्वीकारताना सावनेरचे सरपंच धनराज इंगोले.

नांदगाव खंडेश्वर : प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत महा आवास अभियानातील तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण आमदार प्रताप अडसड व मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पुरस्कारात शिरपूर, सावनेर, नांदसावंगी या ग्रामपंचायतींचा तसेच राज्य पुरस्कृत योजनेत पापळ, एरंडगाव, लोणी, पिंपळगाव बैनाई, शिवणी रसुलापूर, पळसमंडळ, जनुना या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

सावनेर ग्रामपंचायतचा महाआवास अभियानातील पुरस्कार सरपंच धनराज इंगोले यांनी स्वीकारला. पापळ, एरंडगाव, लोणी, पिंपळगाव बैनाई, पळसमंडळ, जनुना येथील उत्कृष्ट घरकुल लाभार्थींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचायत समितीमधील बांधकाम व पंचायत विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रताप अडसड, पंचायत समितीच्या सभापती वैशाली रिठे, उपसभापती राजीव घोडे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे, पंचायत समिती सदस्य रणजित मेश्राम, कांता सावंत, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सहायक गटविकास अधिकारी सतीश खानंदे, नायब तहसीलदार देवेंद्र वासनिक, सुदर्शन सहारे, राठोड, विठ्ठलराव जाधव, संदीप देशमुख, सुनील गोळे, मनीष मदनकर, उमेश भोंडे, विजय अळणे, हितेश लांडे, व्यंकटेश दुरतकर, विकी रत्नपारखी, सावनेरचे सरपंच धनराज इंगोले, उपसरपंच सोनल वैद्य, उज्ज्वला खोब्रागडे, ग्रामसेवक ओमप्रकाश खंडारे तसेच पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट घरकुल लाभार्थी, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मंडळी उपस्थित होती.

Web Title: Distribution of taluka level awards under Maha Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.