विद्यापीठात उशिरापर्यंत ‘विथहेल्ड’ गुणपत्रिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:26+5:302020-12-17T04:40:26+5:30
(फोटो आहे) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी येणारे विद्यार्थी अथवा पालकांना उशिरापर्यंत गुणपत्रिका देण्याची ...
(फोटो आहे)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी येणारे विद्यार्थी अथवा पालकांना उशिरापर्यंत गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बुधवारी उशिरा सायंकाळी ७ वाजतापर्यंत बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय गुणपत्रिका वाटप करण्यात आल्यात.
गत २१ दिवसांपासून विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. परीक्षा विभागात आतापर्यंत सहा अधिकारी- कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले. मात्र, ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या असणारे सुमारे १० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका प्राप्त होताच तपासणीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची गुणपत्रिका देण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा विभागाच्या आयसीआरमधून दरदिवशी १५०० ते २००० हजार गुणपत्रिकांची प्रिन्ट काढून त्या वाटप करण्यात येत आहे. कोरोनाची भीती असतानाही परीक्षा विभागात अधिकारी-कर्मचारी उशिरापर्यंत कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. गुणपत्रिका वाटपाचे नियोजन करण्यात येत असल्याने बुधवारपासून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी गर्दी कमी होत असल्याची माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.