जिल्हा प्रशासनाला लागले प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण
By admin | Published: April 8, 2015 12:22 AM2015-04-08T00:22:36+5:302015-04-08T00:22:36+5:30
जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्य सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात सद्या प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण मोठे लागले आहे.
अनुशेष : निवृत्ती, प्रतिनियुक्ती आणि बदली प्रक्रियेचा फटका
अमरावती : जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्य सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात सद्या प्रभारी अधिकाऱ्यांचे ग्रहण मोठे लागले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती, बदली आणि प्रतिनियुक्ती यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेली प्रमुख अधिकाऱ्यांची पदे सद्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहेत. जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांसह काही पदे अशी आहेत की या ठिकाणी प्रशासकीय कामकाजासाठी पूर्णवेळ अधिकारी असणे आवश्यक आहे. यापैकी सध्या जिल्हा प्रशासनातील सहा प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या पदांची अतिरिक्त जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुळ पदस्थापना असलेल्या अधिकाऱ्यांना अन्य विभागाची कामे करावी लागत आहेत. जिल्हा परिषदेनंतर आता रिक्त पदाच्या बाबतीत आता जिल्हाधिकारी कार्यालयाचा नंबर रिक्त पदांमध्ये लागला आहे. राज्यातील युती शासनाने सत्तेत येता पहिल्यांदा अमरावतीसह विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र याला सहा महिन्याचा अवधी होऊनही अद्यापपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरलेली नाहीत. परिणामी रिक्त पदे व प्रभारी अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कामकाजाचा वाढलेला ताण याचा विपरित परिणाम विविध कामकाजावर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरली जात नाही तर दुसरीकडे विदर्भात नियुक्ती करून पाठविलेले मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी बदलीनंतर नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होत ंंनाहीत (प्रतिनिधी)
हे आहेत प्रभारी अधिकारी
राम सिद्धभट्टी - अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा प्रभार
विनोद शिरभाते - मुळ पदस्थापना भूसंपादन अधिकारी, भूसंपादन अधिकारी वर्ग २ चा प्रभार, खनीकर्म अधिकारी प्रभार.
मोहन पातूरकर - भूसंपादन विभागात पदस्थापना आहे. याशिवाय निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रभार, जिल्हा निवडणूक अधिकारी व ग्रामपंचायत विभागाचा प्रभार.
जिल्हा परिषदेतही रिक्त पदे
जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षापासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी २ पदे रिक्त आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नाही प्रभारी्य ग्रहण लागले आहे.
हे आहेत प्रतिनियुक्तीवर
तेजूसिंग पवार - आरडीसी आहेत ते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे स्वीय सहायक आहेत.
रवींद्र धुरजड - निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी. पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती.
अनिल भटकर - नझुल तहसीलदार आहेत. पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत.
किशोर कामुने - ३१ मार्चला सेवानिवृत्त ाले आहेत.