जिल्ह्यात औषधी बंदीची अंमलबजावणी
By admin | Published: March 22, 2016 12:26 AM2016-03-22T00:26:20+5:302016-03-22T00:26:20+5:30
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ३४४ औषधी कंपनीकडे परत पाठविण्यात येणार आहे,...
विके्रत्यांमध्ये खळबळ : उत्पादकांसह ठोक विक्रेत्यांना सूचना
अमरावती : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ३४४ औषधी कंपनीकडे परत पाठविण्यात येणार आहे, यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादक, होलसेलर, किरकोळ औषधी विक्रेत्यांना या निर्णयाची अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या औषधींमुळे मानवी शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता होती, या औषधांची चाचणी घेतल्यानंतर ही बाब दिसून आली आहे. यानिणर्यांचे आदेश अमरावती विभागाचे अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातही काही औषधी उत्पादक असून ८० च्या जवळपास होलसेलर आहेत. या सर्वांना एफडीएकडून अंमलबजावणीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात बंदी घालणाऱ्या आलेल्या औषधीपैकी किती औषधी बाजारात आहेत, यासंदर्भात एफडीएकडून यादी बनविण्याचे कार्य सुरु असून या औषधीची विक्री व वितरणावर बंदी असल्याच्या सुचना सर्व औषधी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
आयुक्तांच्या आदेशाचे काटकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. बंदी असणाऱ्या औषधीचे उत्पादन, विक्री व वितरण करू नये, अशा सक्त सुचना देण्यात आल्या आहे. या औषधींची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.
- प्र.ना.शेन्डे,
सहायक आयुक्त (औषधी)