जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोंबर मध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:32+5:302021-08-12T04:16:32+5:30

अमरावती; राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकांवर असलेली स्थगिती शासनाने उठविली आहे. तसेच मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ...

District Bank battle in October? | जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोंबर मध्ये?

जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोंबर मध्ये?

googlenewsNext

अमरावती; राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकांवर असलेली स्थगिती शासनाने उठविली आहे. तसेच मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणा कडून येत्या दोन दिवसात आदेश काढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी आणखी १५ ते २० दिवसांचा अवधी लागेल अशी शक्यता आहे.यावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी आक्टोंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकेच्या निवडणुका शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. याबाबत काही संस्था प्रतिनिधी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सहकारातील सर्व संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यत स्थगित करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरण आदेश काढत असते .येत्या दोन दिवसात प्राधिकरण आदेश काढेल असा अंदाज आहे. त्यानंतर मतदार यादी तयार करण्याचे उर्वरित काम पूर्ण होईल त्यानंतर मुख्य निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असा अंदाज आहे.अशातच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक़ेच्या निवडणूकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार सहकार विभागाने सुरू केली आहे.येत्या १३ ऑगस्ट रोजी बॅकेच्या निवडणूकीचे अनुषंगाने अंतिम मतदार यादी जाही होणार आहे.

Web Title: District Bank battle in October?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.