जिल्हा बँंकेतील बातमीचा बॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:22+5:302021-06-16T04:16:22+5:30

आरबीआयच्या १४ जुलै २०१६ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बॅंकेच्या दैनंदिन व्यवहारातील अतिरिक्त निधी नॉन एसएलआरमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च रोजी ...

District Bank News Box | जिल्हा बँंकेतील बातमीचा बॉक्स

जिल्हा बँंकेतील बातमीचा बॉक्स

Next

आरबीआयच्या १४ जुलै २०१६ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे बॅंकेच्या दैनंदिन व्यवहारातील अतिरिक्त निधी नॉन एसएलआरमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च रोजी असलेल्या एकूण ठेवींच्या १० टक्क्यांपर्यंत गुंतवितो येतो. मात्र, जिल्हा बँकेने ३४ टक्क्यापर्यंत गुंतवणूक केली, असे बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आले. पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत तसे नमूद करण्यात आले. १२ एप्रिल रोजी लेखापरीक्षण केले असता, यात त्या काळातील बँकेचे अधिकारी कर्मचारी दोषी असल्याचे म्हटले आहे. बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ब्रोकर यांनी संगनमत करून बँकेच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून तसेच खोट्या सह्या करून बँकेची ३ कोटी ३९ लाख २३ हजार ३१९ रुपयांनी फसवणूक केल्याचे जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: District Bank News Box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.