जिल्हा बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:16+5:302021-04-20T04:14:16+5:30
सर्वोच्य न्यायालयाने स्पेशल लिव्ह पिटिशन (सिव्हील) १८ फेब्रुवारीला खारीज केले होते व बँकेवर २२ फेब्रुवारी २०२१ ला प्रशासकाची नियुक्ती ...
सर्वोच्य न्यायालयाने स्पेशल लिव्ह पिटिशन (सिव्हील) १८ फेब्रुवारीला खारीज केले होते व बँकेवर २२ फेब्रुवारी २०२१ ला प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकांच्या सहा महिन्याच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन पदभार नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ चे नियम १० (२) मधील तरतुदीनूसार संस्थेच्या समितीची मुदत संपन्यापूर्वी १५० दिवस अगोदर सभासद संस्थांकडून प्रतिनिधींची नावे मागविण्याची प्रक्रिया आरंभ करणे आवश्यक आहे. त्यानूसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरीता तयार करावयाचा प्राथमिक मतदार यादीचा अर्हता दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ हा निश्चित करण्यात आलेला आहे
बॉक्स
मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम
सभासद संस्थेचे ठराव मागविणे : २६ एप्रिल ते २५ मे
प्रारुप मतदार यादी सादर करणे : ३१ मे २०२१
निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा यादी प्रसिद्धी : ४ जून
आक्षेप सादर करण्याची अंतिम दिनांक : ४ ते १४ जून
आक्षेपावर अंतिम निर्णय देणे : १४ ते २४ जून
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी : २८ जून २०२१