जिल्हा बॅंक अपहार प्रकरणात ‘से’ दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:50+5:302021-06-30T04:09:50+5:30
अमरावती: सुमारे ७०० कोटी रुपये गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या प्रकरणात मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने ...
अमरावती: सुमारे ७०० कोटी रुपये गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या प्रकरणात मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक न्यायालयात ‘से’ दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ जुलै रोजी होणार आहे.
तत्पुर्वी गुन्हा दाखल असलेल्या ११ पैकी सात आरोपींनी अटकपुर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने तपास करणार्या आर्थिक गुन्हे शाखेला से दाखल करण्याचे निदेर्श दिले होते. त्यानुसार, वरिष्ट पोलीस निरिक्षक शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात याबाबत पोलिसांची बाजु लेखी स्वरूपात मांडण्यात येणार आहे.
जिल्हा मध्यवतीर् सहकारी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी याप्रकरणी १५ जुन रोजी शहर कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, बॅंकेच्या तत्कालिन सीईओंसह पाच अधिकारी व सहा ब्रोकर्सविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरण आर्थिक अपहाराचे असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तर, २५ जुन रोजी वरिष्ट पोलीस निरिक्षक शिवाजी बचाटे यांनी बॅंकेत जाऊन तपासासाठी आवश्यक दस्तावेज ताब्यात घेतला होता. त्यानंतर आरोपींनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायलयात धाव घेतली.