शेंडगावच्या विकास आराखड्याची फाइल जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:49 AM2018-01-19T00:49:51+5:302018-01-19T00:50:19+5:30
शेंडगावच्या विकास आरखड्याची फाइल मागविली असून, त्रुटी दुरुस्त करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी पर्वावर शेंडगावच्या विकास आरखड्याचा प्रस्ताव धूळखात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेंडगावच्या विकास आरखड्याची फाइल मागविली असून, त्रुटी दुरुस्त करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी पर्वावर शेंडगावच्या विकास आरखड्याचा प्रस्ताव धूळखात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.
शेंडगावच्या विकास आरखडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरात दिली की, गाडगेबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. शेंडगाव येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गाडगेबाबांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण करून शेंडगावच्या विकास आरखड्यासाठी २५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, वर्ष लोटूनही सदर विकास आराखड्याला अंतिम मान्यता मिळाली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शेंडगावच्या विकासासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. पुतळा परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
शेंडगावच्या विकास आराखड्याची फाइल मागविली आहे. काही त्रुटी असतील, तर त्या दुरुस्त करून शासनाकडे पाठविण्यात येईल.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.