जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2023 07:55 PM2023-07-24T19:55:44+5:302023-07-24T19:56:37+5:30
कटियार हे मूळ लखनऊ येथील आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६ मध्ये आय.ए.एस. सेवेत त्यांची निवड झाली.
अमरावती : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यापूर्वीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शक व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
कटियार हे मूळ लखनऊ येथील आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१६ मध्ये आय.ए.एस. सेवेत त्यांची निवड झाली. त्यांनी कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.टेक. तसेच एम.टेक केले. सोबतच आय.ए.एस. ची तयारी केली. निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात डहाणू येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी अकोला येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले.