घरकुलासाठी जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:11 PM2017-08-28T23:11:19+5:302017-08-28T23:11:41+5:30

स्थानिक महापालिका हद्दीतील जोग स्टेडीयम प्रभागातील बिच्छूटेकडी, गजानननगर, आर्दश नेहरू नगर व शहरातील इतर झोपडपट्टी असलेल्या परिसरात प्रशासनाद्वारे सर्व्हे करण्यात आला.

District Collector's house collapsed | घरकुलासाठी जिल्हा कचेरीवर धडक

घरकुलासाठी जिल्हा कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्देनिवेदन : बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात न्यायाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक महापालिका हद्दीतील जोग स्टेडीयम प्रभागातील बिच्छूटेकडी, गजानननगर, आर्दश नेहरू नगर व शहरातील इतर झोपडपट्टी असलेल्या परिसरात प्रशासनाद्वारे सर्व्हे करण्यात आला. मात्र यामधील अटी व शर्तीमुळे अनेक गोरगरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी सोमवारी अपर जिल्हाधिकारी के.आर परदेशी यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात आलेल्या नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील बºयाच स्लम भागात प्रशासनाने घरकुलासाठी सर्व्हे केला आहे. मात्र घरकुलासाठी संबंधित लाभार्थ्यांना पी.आर.कार्ड अथवा सहा दोन मागितलेला आहे. या योजनेमध्ये पीआर कार्ड किंवा सहा दोन असेल अशाच लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. मात्र ही अट त्यामध्ये समाविष्ट आहे. या अटीमुळे एकाही भागातील लाभार्थ्यांना घरकूल मंजूर होऊ शकले नाही. त्यासोबतच दुसरी अटीमध्ये त्या लाभार्थ्यांना जागा देऊन त्याचठिकाणी फ्लॅट सिस्टीम बांधून द्यावी अशी आहे. परंतु अमरावती सारख्या शहरात हे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या जाचक अटी शिथिल करण्यासाठी पाठपुरावा करावा व गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे. दरम्यान याबाबत योग्य कारवाईचे आश्वासन अपर जिल्हाधिकाºयांनी दिले. यावेळी बबलू शेखावत, वंदना कंगाले, शोभा शिंदे व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: District Collector's house collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.