खेड ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:23+5:302021-03-22T04:12:23+5:30

मोर्शी : तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सरपंच कल्याणी प्रीतम राजस यांनी ...

District Collector's visit to Khed Gram Panchayat | खेड ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

खेड ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

googlenewsNext

मोर्शी : तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सरपंच कल्याणी प्रीतम राजस यांनी त्यांचे स्वागत केले.

गावाशेजारच्या चारघड नदीचे खोलीकरण करण्याची मागणी सरपंच राजस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. नदीला पूर आल्यावर घरात पाणी शिरून गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. घरकुल, अतिक्रमण व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मोहन राजस, ग्रामविकास अधिकारी मांडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी वाघमारे उपस्थित होते.

महाराष्ट्राचे प्रथम ग्रामविकास मंत्री आबासाहेब खेडकर यांचा जन्म हिवरखेड येथे झाला. आजही त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. सरपंच कल्याणी राजस यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यापुढे हा इतिहास कथन केला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकासात्मक कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

-----------

Web Title: District Collector's visit to Khed Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.