कोरोनामुळे अनाथ बालकांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:38+5:302021-06-25T04:11:38+5:30

अमरावती : कोरोनामुळे पालक गमावलेल्या इनायतपूर येथील बालकांच्या घरी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची विचारपूस ...

District Collector's visit to orphanage due to corona | कोरोनामुळे अनाथ बालकांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कोरोनामुळे अनाथ बालकांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Next

अमरावती : कोरोनामुळे पालक गमावलेल्या इनायतपूर येथील बालकांच्या घरी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची विचारपूस केली. एकही अनाथ बालक वंचित राहू नये, यासाठी सर्वदूर शोधमोहिम, मदत मिळवून देणे, संस्थेत दाखल करणे आदी प्रक्रिया सातत्याने राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी शासनाकडून योजना राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चांदूर बाजार तालुक्यातील इनायतपूर येथे भेट दिली. तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. इनायतपूर येथील सुशांत राजेश धोंडे या ११ वर्षीय व जागृती राजेश धोंडे या १३ वर्षीय बालिकेच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. या बालकांचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले. त्यामुळे आईचा आधार होता. मात्र, अलीकडेच कोरोनामुळे आईचेही निधन झाले. त्यामुळे या बालकांच्या योग्य संगोपनाच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: District Collector's visit to orphanage due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.