अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:20 PM2018-10-24T22:20:20+5:302018-10-24T22:20:53+5:30

लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.

District Congress claim on Amravati Lok Sabha seat | अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

Next
ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचा ठराव : अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेश काँग्रेसच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.
जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर अध्यक्षांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सोडल्यास पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा दावा करीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. मूग, उडीद खरेदीसाठी शासकीय खरेदी केंदे्र त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे थकलेले तुरीचे चुकारे विनाविलंब द्यावे आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ अ‍ॅपबाबत आढावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याबाबत तालुका व शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या. तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या आंदोलने व पूर्वतयारीचा आढावा जिल्हाध्यक्षांनी घेतला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीचे गठण त्वरित करण्याचे निर्देश दिले. बैठकीला तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, महेंद्रसिंह गैलवार, श्रीकांत झोडपे, श्रीधर काळे, प्रदीप वाघ, दीपक सवई, मिश्रीलाल झारखंडे, प्रमोद दाळू, बाबाराव बहुरूपी, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेश मांगलेकर, ईश्वर बुंदेले, रवि हिरूळकर, हसन खान पठाण, राजा पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसकडे मागणी
अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राखली नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही जागा आता काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव महेंद्र गैलवार यांनी मांडला. त्याला सुधाकर भारसाकळे यांनी अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर करून अंतिम निर्णयासाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे बबलू देशमुख म्हणाले.

Web Title: District Congress claim on Amravati Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.