जिल्हा काँग्रेसचे कोविड सहायता केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:28+5:302021-04-13T04:12:28+5:30

अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड सहायता केंद्र व जनजागण मोहीम महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू ...

District Congress Kovid Help Center | जिल्हा काँग्रेसचे कोविड सहायता केंद्र

जिल्हा काँग्रेसचे कोविड सहायता केंद्र

Next

अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने कोविड सहायता केंद्र व जनजागण मोहीम महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला.

या उपक्रमातंर्गत काँग्रेस सहायता केंद्रामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, कोरोना चाचणीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, रक्ताचा तुटवडा असल्याने सर्व आरोग्यबाबतच्या सोई-सुविधांसाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. कोरोना रुग्ण, संपर्कातील व्यक्ती तसेच रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १४ तालुक्यांत कोविड सहायता केंद्राव्दारे काँग्रेसचे पदाधिकारी मदत करणार आहेत.

बाॅक्स

सहायता कक्ष स्थापन

जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने या कक्षाचे जिल्हा केंद्रप्रमुख म्हणून झेडपीचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी नेमणूक केली आहे. तालुक्याचे प्रमुख म्हणून गिरीश कराळे वरूड, रमेश काळे मोर्शी, भाष्कर हिरडे चांदूर बाजार, कैलास आवारे, विजय मडघे अचलपूर, सुुभाष मनोहर धारणी, विनोद पवार दर्यापूर, सुरेश आडे अंजनगाव सुर्जी, जयंत देशमुख भातकुली, दयाराम काळे चिखलदरा, गजनान राठोड अमरावती, संदीप आमले तिवसा, श्रीकांत गावंडे धामणगाव रेल्वे, गणेश आरेकर चांदूर रेल्वे, निशांत जाधव नांदगाव खंडेश्र्वर आदींची नियुक्ती केली आहे. कोरोना संदर्भात वैद्यकीय सुविधेसाठी काँग्रेसच्या केंद्र प्रमुखांसोबत नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे.

Web Title: District Congress Kovid Help Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.