जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:31+5:302021-09-18T04:13:31+5:30

परतवाडा : अमरावती जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगर पालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या ...

District Corona on the way to liberation | जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर

जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर

Next

परतवाडा : अमरावती जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगर पालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या शून्य असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा जयघोष अचलपूर नगरपालिका कचरा गाडीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात आजही करीत आहे.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रात घरोघरी गाड्या कचरा संकलन करीत आहेत. नगरपालिका क्षेत्रात दररोज फिरणाऱ्या या गाड्यांवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. या ध्वनिक्षेपकावर स्वच्छ भारत सुंदर भारतची कॅसेट वाजविली जात आहे. याच दरम्यान या ध्वनिक्षेपकावरून शहरातील नागरिकांना एक आवाहन केले जात आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्कचा वापर करा, हात धुवा असे या ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सुचित केल्या जात आहे. यावर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या कधी एक तर कधी दोन, बरेचदा शून्य ही निघत असल्याची आकडेवारी शल्यचिकित्सकांकडून जाहीर केली जात आहे. ज्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या त्यादिवशी जिल्हा कोरोना मुक्त झाल्याचा आनंदही व्यक्त केला जात आहे. असे असतानाही अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याचे अचलपूर नगरपालिकेकडून दररोज जाहीर केले जात आहे.

प्रत्यक्षात कोरोना रुग्णांअभावी कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालय ओस पडले आहे. अचलपूर नगर परिषदेच्या विद्यालयातील कोरोना टेस्टिंग सेंटरही मागील एक महिन्यापासून बंद करण्यात आले आहे.एवढेच नव्हे तर कोरोना रुग्ण निघत नसल्यामुळे काही कर्मचारी वर्गही कमी करण्यात आला आहे. पण, या बदलत्या परिस्थितीचा विसर पडल्यामुळे की काय अचलपूर नगर परिषदेकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा जयघोष आजही कचरा गाड्यांवरून केला जात आहे.

दिनांक17/09/21 फोटो

Web Title: District Corona on the way to liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.