अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे जिल्हाभरातून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:34 AM2019-11-10T01:34:38+5:302019-11-10T01:35:22+5:30

पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक असे ७४ पोलीस अधिकारी, १ हजार ३५९ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी, एक प्लाटून व ४११ होमगार्डचा बंदोबस्त शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लावण्यात आला होता.

District court welcomes Ayodhya case results | अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे जिल्हाभरातून स्वागत

अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे जिल्हाभरातून स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात शांततेचे वातावरण : कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अयोध्या प्रकरणाचा निकाल लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते. तथापि, शनिवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अमरावतीकरांनी अत्यंत शांततेने स्वागत केले. ही शांतता अमरावतीकरांमधील एकोप्याची भावना अधोरेखित करीत होती. नियोजनबद्ध बंदोबस्त, शांतता राखण्याचे आवाहन यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांनीही यश मिळाले.
कालानंतर जनभावना कशा राहतील, याबाबत देशभरात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे निकालाच्या दिवशी नागरिकांनी शांतता ठेअयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मशीद खटल्याच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून बहुप्रतीक्षित निकालाबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, तत्पूर्वी या निवावी, सोशल मीडियावर प्रक्षोभक विधान किंवा संदेश पाठवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला अमरावतीकरांनीही प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सर्वाेच्च न्यायालयात निकालाचे वाचन सुरू झाल्यानंतर बहुतांश अमरावतीकरांनी टीव्ही व मोबाइलद्वारे निकालाकडे लक्ष केंद्रित केले. निकालावर अमरावतीकरांनी सार्वजनिक ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत.
दरम्यान, निकालाच्या अनुषंगाने शहर व ग्रामीण पोलिसांनीही बंदोबस्त लावला होता. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक मुख्य चौकात पोलिसांनी फिक्स पॉइंट लावून नागरिकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी ठाण्यांना भेटी दिल्या.

असा होता शहर पोलिसांचा बंदोबस्त
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक असे ७४ पोलीस अधिकारी, १ हजार ३५९ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी, एक प्लाटून व ४११ होमगार्डचा बंदोबस्त शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लावण्यात आला होता. दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११२ फिक्स पॉइंट लावून वाहने व नागरिकांवर लक्ष ठेवण्यात आले. ३७ पेट्रोलिंग पथकांनी शहरात सातत्याने गस्त लावून आढावा घेतला. १४ स्ट्राइकिंग फोर्स विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. एसआरपीएफचे एक प्लाटून, दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे नऊ सेक्शन, सीआरओची दोन राखीव पथके, तर डिटेनसाठी एक पथक वसंत हॉल येथे तैनात होते.

असा होता ग्रामीण हद्दीत बंदोबस्त
पोलीस अधीक्षक हरि बालाजी एन यांच्या नेत्तृत्वात ग्रामीण हद्दीतील ३० पोलीस ठाण्याच्या परिसरात १ एएसपी, ८ डिवायएसपी, ३० पोलीस निरीक्षक, ७० एपीआय, १०० पीएसआय, २ हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या दोन कंपन्या, आरसीपीचे ५ प्लॉटून, ७०० होमगार्ड असा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. याशिवाय प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत फिक्स पाईन्ट व पेट्रोलींग पथक सातत्याने गस्तीवर होते. अयोध्या प्रकरण व ईद-ए- मिलाद या उत्सवाच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री प्रतिष्ठाने ९ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजतापासून ते १० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत झाले आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया संबधीत परवानाधारकाविरुधअद नियमानुसार योग्य ती कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत झाले आहे.

लाऊड स्पीकर वाजविणाऱ्यास नोटीस
गाडगेनगर हद्दीतील एका ठिकाणी चारचाकी वाहनावर धार्मिक गाणी वाजवून एका कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती लाऊड स्पीकरवर दिली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गाडगेनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ठाण्यात बोलावून नोटीस बजावली.

वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअ‍ॅप शुभेच्छा
मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दररोज विविध संदेशांचा भडिमार सुरू असतो. मात्र, शनिवारी अनेकांची गोची झाली. अनेकांना शुभेच्छा संदेश वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पाठवावे लागले. अनेकांनी अयोध्या निकालाच्या शुभेच्छाही वैयक्तिकरीत्या पाठविल्या गेल्याचे निदर्शनास आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ताबा ठेवण्याचे निर्देश
सोशल मीडिया व व्हॉट्सअ‍ॅप समूहावर संदेश पाठविण्याचे अधिकार फक्त अ‍ॅडमिनला असण्याची व्यवस्था केली जावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच शहरातील बहुतांश व्हॉटसअ‍ॅप समूहावर अ‍ॅडमिनचाच बोलबाला होता. अन्य व्यक्तींना संदेश पाठविता आले नाही.

फटाके फोडणारा तरुण अटक

अचलपूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडणाऱ्या व बीभत्स आरडाओरड केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरेश गौर (२८, रा. बुंदेलपुरा) असे ताब्यात अचलपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, सहकलम १३५ अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हा प्रकार घडल्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सांगितले.

Web Title: District court welcomes Ayodhya case results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.