शिक्षण बचाव कृती समितीचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Published: November 7, 2015 12:16 AM2015-11-07T00:16:56+5:302015-11-07T00:17:26+5:30
राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन राबवीत असलेल्या अन्यायकारक धोरणाविरुध्द शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
अमरावती : राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन राबवीत असलेल्या अन्यायकारक धोरणाविरुध्द शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता अमरावती जिल्हा शिक्षणसंस्थासंघ व अमरावती जिल्हा शिक्षण बचावकृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यासंदर्भाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंंडे यांच्या निवासस्थानी पार पडली.
संघटना व शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालक यांना हितकारक नसलेले धोरण शासनाने त्वरित बंद करावे, अशी मागणी आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष कांचनमाला गावंडे, सचिव आर.बी. कळसकर, महेंद्र सोमवंशी, मेघशाम करडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन.टी. अर्डक, सचिव अशोक चोपडे,राज्य कलाध्यापक संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष संगीता शिंदे, शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष अरुण खोडस्कर, प्रयोगशाळा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग काकडे, अमरावती जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष जयंत भोपत, राजकुमार चैनानी, विश्वनाथ संदाशिवे, केशव पाटील, नरेंद्र मोहोड, नितीन चव्हाळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)