मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील जि.प. शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:38 PM2018-03-25T23:38:24+5:302018-03-25T23:38:24+5:30

पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा सध्या सकाळच्या ६.५० ते ११.५० या वेळेत सुरू झाल्या असून, त्या वेळेत मुख्यालयापासून ६ कि.मी. अंतरावरील जिल्हा परिषद शाळा उतावली व कढाव या शाळा बंद दिसून आल्या. त्यामुळे शिक्षकांवर वरिष्ठ अधिकाºयांचा वचक नसल्यामुळेच मेळघाटात शिक्षणाचे तीन तेरा वाजत आहे.

District headquarters School closed | मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील जि.प. शाळा बंद

मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील जि.प. शाळा बंद

googlenewsNext
ठळक मुद्देमेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा : अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा परिणाम

आॅनलाईन लोकमत
धारणी : पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा सध्या सकाळच्या ६.५० ते ११.५० या वेळेत सुरू झाल्या असून, त्या वेळेत मुख्यालयापासून ६ कि.मी. अंतरावरील जिल्हा परिषद शाळा उतावली व कढाव या शाळा बंद दिसून आल्या. त्यामुळे शिक्षकांवर वरिष्ठ अधिकाºयांचा वचक नसल्यामुळेच मेळघाटात शिक्षणाचे तीन तेरा वाजत आहे.
मुख्यालयापासून ६ कि मी अंतर असलेल्या जिल्हा परिषद शाळा उतावली येथे 'लोकमत' चमूने गुरुवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी भेट दिली असता, कार्यालयाला कुलूप दिसून आले व एकही शिक्षक व विध्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते.
फक्त तेथील सफाई कर्मचारी वर्गखोलीमध्ये झाडू मारत होते. त्यानंतर वेळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी जि. प.शाळा कढाव या शाळेचीसुद्धा बंदची परिस्तिथी दिसून आली, तर तेथील नागरिकांनीसुद्धा शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढले. मुख्यालयापासून अवघ्या ६ किमी अंतरावरील शाळेचीच ही परिस्थिती असेल तर अतिदुर्गम भागातील जि.प. च्या शाळेची काय स्तिथी असणार ? शिक्षण प्रणालीकडे व शिक्षकांवर वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याचा हा परिणाम असून अधिकारीच शिक्षकांच्या वेठबिगारीला खतपाणी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या शाळेत सुरू होते अध्ययनाचे कार्य
धारणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोड, बिहादा, बेरदाबल्दा, भुलोरी, घोटा, रानामालूर, लवादा, चित्री, बोरी, कोठा, जांबू, कोट, हरिसाल या शाळांना गुरुवारी भेट दिली असता विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते व शिक्षादानाचे कार्य सुरू होते.

महिला खिचडी कर्मचाºयांच्या समस्या
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील महिला खिचडी कर्मचारी हे अगदी तोकड्या मानधनावर काम करीत असून, त्यांना तीन ते चार महिन्यांपासून मानधन व इंधन बिलाचे पैसेसुद्धा वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी लोकमत चमुकडे मांडण्यात आल्या. त्यांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

गटशिक्षण अधिकारी, शिक्षिण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना लेटलतीफ शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मी सुद्धा उद्यापासून शाळांना भेटीदेणार आहे. माझ्या निदर्शनात येणाºया लेटलतीफ शिक्षकांवर आॅन दी स्पॉट कारवाई करेन.
-डॉ उमेश देशमुख,
गटविकास अधिकारी पंचायत समिती, धारणी

शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी शिक्षकांना वाºयावर सोडल्यामुळे शिक्षक मनमानी कारभार करीत आहे. एकदा सर्व शाळांचा आढावा घेउन ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आणून दिली होती. पं.स. च्या मासिक सभेत ठराव घेऊन कारवाई करण्याचे सांगितले जाईल.
- रोहित पटेल, सभापती, पं. स. धारणी

Web Title: District headquarters School closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.