पोलीस पाटील संघटनेची जिल्हास्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:20+5:302021-09-23T04:14:20+5:30
वनोजा बाग-अंजनगाव सुर्जी : राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित विषयासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची जिल्हास्तरीय ...
वनोजा बाग-अंजनगाव सुर्जी : राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित विषयासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच अंजनगाव सुर्जी येथे श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्य मार्गदर्शक राजेश घोगरे होते. प्रमुख उपस्थिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल उके, विदर्भ अध्यक्ष नारायणराव ढवळे, सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ट चौबे, सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर बोंडे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप सोळंके, जिल्हा निमंत्रक संजय बुरंगे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन गोरले, ज्येष्ठ पोलीस पाटील डुकरे, महिला पोलीस पाटील वैशाली शेळके, सीमा साबळे, वंदना पाथरे, सपना ढोक, वृषाली घोगरे, प्रतिभा रोहणकर, जिल्हा महासचिव पंजाबराव गजबे, निलांकात पुसदेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
दर्यापूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर देवके, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष श्रीनिवास तायडे, चिखलदरा तालुकाध्यक्ष सुधाकर चिलात्रे, भातुकली तालुका प्रभारी अमजद खान पठाण, अचलपूर तालुका प्रभारी पांडुरंग खडके, सचिव अमोल खांडे यांच्यासह सर्व कार्यकारिणी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. संचालन विदर्भ महासचिव प्रा. टी.बी. रामटेके व आभार प्रदर्शन अंजनगाव तालुकाध्यक्ष रवींद्र राजगुरू यांनी केले. बैठकीला सर्व तालुक्यातील पोलीस पाटील आणि तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.