पोलीस पाटील संघटनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:24+5:302021-08-24T04:16:24+5:30
ज्येष्ठ पोलीस पाटील राजेश घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल उके यांच्या मार्गदर्शनात झालेल्या बैठकीला अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य ...
ज्येष्ठ पोलीस पाटील राजेश घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल उके यांच्या मार्गदर्शनात झालेल्या बैठकीला अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे उपस्थित होते. जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप पाटील सोळंके, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर बोंडे, जिल्हा निमंत्रक संजय बुरंगे, जिल्हा उपाध्यक्ष बब्बू अजनेरिया, नितीन गोरले, जिल्हा महासचिव पंजाबराव गजबे, शोएब शाह, जिल्हा संघटक रवींद्र खारोडे, निलाकांत पुसदेकर, अचलपूर तालुका प्रभारी पांडुरंग खडके, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष श्रीनिवास तायडे, अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष रवींद्र राजगुरू, चिखलदरा तालुकाध्यक्ष सुधाकर चिलात्रे उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलीस पाटलांवर झालेल्या अन्यायाचा आढावा घेण्याकरिता जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरपंच, पोलीस पाटील कामकाजात सहकार्य करून आपले गाव प्रगतिपथावर नेण्यास कटिबद्ध राहतील, असा विश्वास पुरुषोत्तम घोगरे यांनी व्यक्त केला.
बैठकीत उत्कृष्ट जिल्हा पोलीस पाटील जाहीर झालेले बब्बू अजनेरीया यांचा व नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी संजय बुरंगे, चंद्रशेखर बोंडे, सुनील अलोने यांचा सत्कार करण्यात आला. युवा पोलीस पाटलांवर तालुक्याच्या जबाबदारी देण्यात आली. नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे नियोजन अचलपूर तालुका पोलिस पाटील (असोसिएशन) संघटनेने केले होते. संचालन विदर्भ महासचिव प्रा.टि. रामटेके व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप सोळंके यांनी केले.
बैठकीला पोलीस पाटील श्रीकृष्ण रहाटे, अमोल खांडे, प्रशांत पवार, शैलेश पोटे, सतीश तायडे, सचिन बेंदरे, श्रीकृष्ण साबळे, रूपेश काळे, रवींद्र पाथरे, शिवराज ढोक, श्यामसुंदर काकड, एन. भटकर, प्रदीप सपाटे, गजानन तळोकार, जानराव ढोले, कमल उके, अजय बेलसरे, परसु काळे, रवींद्र रोहणकर, अमोल मानकर, प्रशांत पडगव्हाणकर, सुधीर जामूनकर, राजेश पाळे, अशोक चिकटे, राजेश तळोकार, सचिन बेंदरकर, मनीराम दहीकर, प्रफुल्ल भोरे आदी पोलीस पाटील उपस्थिती होते.