जिल्ह्याचा महसूल विभाग ‘आॅफलाईन’
By admin | Published: January 17, 2016 12:09 AM2016-01-17T00:09:47+5:302016-01-17T00:09:47+5:30
जिल्ह्यातील १४ ही तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने महसूल विभाग आॅफलाईन झाला आहे,
इंटरनेट सुविधा बंद : तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी सेवा ठप्प
अमरावती : जिल्ह्यातील १४ ही तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने महसूल विभाग आॅफलाईन झाला आहे, विभागाअंतर्गत कामे खोलंबली आहे. तसेच दोन महिन्यापासून तलाठ्यांनाही इंटरनेट सेवेसाठी ७५० रुपये वेतनात देण्यात आलेले नसल्याने थकीत बील अभावी त्यांचेही इंटरनेट सुविधा बंद असल्याने महसूल विभागाचा कारभार ठप्प झाला आहे.
तहसील कार्यालयाची इंटरनेट सेवा व पाच दिवसापासून बंद आहे. त्यामुळे आॅनलाईन सात-बारा, तहसीलदार व त्यांचे प्रस्तुतकार यांची कामे, आस्थापना विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक विषयक कामे व नेहमी असणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरस सेवा ठप्प झाल्या आहेत. तहसील कार्यालयाचा उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी इंटरनेट सेवेद्वारा दररोज असणारा संवाद बंद झाला आहे. जिल्हा प्रशासनाने देखील गांर्भीयाने घेतले नसल्याने संपूर्ण जिल्ह्याची महसूल यंत्रणा आॅफलाईन झालेली आहे.
शासनाने १ आॅगस्ट रोजी प्रत्येक तलाठ्याला वेतनात ७५० रुपये इंटरनेट सुविधेसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. आॅॅगस्ट ते सॅप्टेंबर २०१५ पर्यंत तलाठ्यांनी वेतनात इंटरनेटसाठी वाढ मिळेल याची वाट पहाली परंतु शासनाकडून प्रतिसाद नसल्याने त्यांनी देखील थकीत बिल अभावी इंटरनेट सुविधा बंद झाली आहे. यामुळे शासनाच्या महाराजस्व अभियानाचा देखील बोजवारा उडाला आहे.