जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:32+5:302021-08-22T04:16:32+5:30
डेंग्यूच्या वाढत्या प्रदुर्भावावर ॲक्शन घेण्याचे निर्देश तिवसा : तालुक्यात डेंग्यू या आजाराने होत असलेल्या मृत्यूमुळे आरोग्य प्रशासनावर नागरिकांकडून ताशेरे ...
डेंग्यूच्या वाढत्या प्रदुर्भावावर ॲक्शन घेण्याचे निर्देश
तिवसा : तालुक्यात डेंग्यू या आजाराने होत असलेल्या मृत्यूमुळे आरोग्य प्रशासनावर नागरिकांकडून ताशेरे ओढले जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी शनिवारी तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना उपाययोजनांसंदर्भात निर्देश दिले. एक महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.एकट्या तिवसा शहरात संसर्गाने मृत्यू वाढत असून नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. यामुळे तिवसा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी घोडाम, डॉ. जोगी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौरव विधळे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे उपस्थित होत्या.