विकासाच्या वाटचालीत जिल्हा आघाडीवर
By admin | Published: May 2, 2017 12:40 AM2017-05-02T00:40:58+5:302017-05-02T00:40:58+5:30
विकासाच्या वाटचालीत अमरावती जिल्हा आघाडीवर असून कृषी, उद्योग, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वाची कामे झाली आहेत,...
पालकमंत्री : राज्याचा ५७ वा स्थापना दिन उत्साहात
अमरावती : विकासाच्या वाटचालीत अमरावती जिल्हा आघाडीवर असून कृषी, उद्योग, कौशल्य विकास, जलसंधारण, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वाची कामे झाली आहेत, असे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पोटे यांच्या हस्ते झाला.
यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांचा यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल गौरविण्यात आले. ध्वजारोहण व राष्ट्रगीतानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी कवायतीत जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, अग्निशमन दल, वाहतूक नियंत्रण शाखा आदी विविध सुरक्षा पथकांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)