कोरोना काळात मजुरांना रोजगार देण्यात राज्यात जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:44+5:302021-03-25T04:14:44+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात ...

The district topped the state in providing employment to laborers during the Corona period | कोरोना काळात मजुरांना रोजगार देण्यात राज्यात जिल्हा अव्वल

कोरोना काळात मजुरांना रोजगार देण्यात राज्यात जिल्हा अव्वल

googlenewsNext

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात मजुरांना काम मिळणे जिकरीचेे असताना जिल्ह्यात मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्न झाले. यात माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) ९५.५१ लक्ष मनुष्यदिन म्हणजेच ९५,५१० कुटुंबांना किमान १०० दिवसांचा रोजगार मिळालेला आहे. यात अमरावती जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पालघर जिल्ह्यात ४६,६९० कुटुंबाला रोजगार मिळाला आहे. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकात मनुष्यदिन निर्मितीत मोठी तफावत आहे.

सन २०२०-२१ मध्ये या कामांवर यंत्रणेद्वारा २४० कोटी ६१ लाख ५१ हजारांचा खर्च झालेला आहे तर गोंदिया जिल्हा १३३.०१ कोटीसह दुसरा व पालघर १२६.६६ कोटी खर्चासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. निधी खर्चातही राज्यात अमरावती जिल्ह्याने प्रथम स्थान सातत्याने राखले आहे. कोरोना काळात मजुरांना रोजगार मिळण्याचे उद्देशाने मजुरांना कोरोना उपाययोजनांचे पालन करून त्यांच्या गावातच मग्रारोहयोची कामे उपलब्ध करण्यात आली.

रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्या माहितीनुसार सन २०१९-२० मध्ये जिल्ह्याला मनुष्यदिनाचे उद्दिष्ट ९९.५७ लक्ष होते. यात मनुष्यदिन निर्मिती ७०.६२ लक्ष झाली. सन२०२०-२१ मध्ये उद्दिष्ट होते. २४ मार्च २०२१ मनुष्यबळाची निर्मिती ९६.५१ लक्ष झालेली आहे. ही सरासरी उद्दिष्टांच्या ११४ टक्के आहे.

पाईंटर

मनरेगावर दैनिक मजूर्

एप्रिल २०२० : १९,३४६

मे २०२० : ९६,९३०

बॉक्स

मग्रारोहयोत झाली ही कामे

उपस्थित मजुरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध व्हावे, याकरिता सीसीटी, डीसीटी रस्ते, शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, तुती लागवड, सार्वजनिक विहीर तसेच जलसंधारणाची कामे उपलब्ध करण्यात आली. यात कोरोना काळात एप्रिल २०२० मध्ये १९,३४६, तर मे महिन्यात ९६,९३० एवढी दैनंदिन मजुरांची उपस्थित होती.

बॉक्स

अन्य योजनेच्या सांगड घालून नरेगाची २८ कामे

मग्रारोहयोतंर्गत इतर योजनेची सांगड घालून २८ प्रकारची कामे करण्यात येत आहेत. यात शाळेसाठी खेळाचे मैदान, संरक्षक भिंत बांधणे, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह, नाला, मोरी बांधकाम, गोदाम, सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, पेव्हींग ब्लॉक रस्ते, डांबर रस्ता, मैदानाला सखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, मत्स्यतळे, शेततळे, नाला बांधकाम, भूमिगत बंधारा, सिमेंट नाला बांध, गॅब्रियम बंधारा, सामूहिक गोठे, स्माशनभूमी शेड, असे एकूण १४८ कामे १५ वा वित्त आयोग व आमदार निधीतून करण्यात येत आहे.

बॉक्स

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पना

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ संकल्पनेतून मग्रारोहयोच्या माध्यमातून फळबाग लागवडीचे नियोजन आहे. वृक्ष लागवड करताना त्यापासून उत्पन्न मिळेल अशा प्रजातीचा वापर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सन २०२१-२२ चे जिल्हा लेबर बजेट व कृती आरखडा ४,३९३ कोटींचा तयार करण्यात आला. जो गत वर्षीच्या तुलनेत २.५ पट अधिक असल्याचे सांगण्यात आले.

कोट

जिल्ह्यात हातांना रोजगाराची हमी, रोजगारातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन साधून भौतिक सुविधा निर्मिती बरोबरच लखपती शेतकरी व लखपती कष्टकरी तयार होतील. यासाठी सांघिक भावनेतून यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे यशाची नवनवीन शिखरे गाठणे शक्य होईल, असा विश्वास आहे.

राम लंके

उपजिल्हाधिकारी (रोहयो)

Web Title: The district topped the state in providing employment to laborers during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.