जिल्हा महिला काँग्रेस राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:04 PM2018-10-06T23:04:22+5:302018-10-06T23:04:39+5:30
देशासह राज्यात सदस्य नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानात अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने सर्वाधिक महिला सदस्यांची नोंदणी करीत राज्यात अग्रक्रम मिळविला. व्दितीय पुणे ग्रामीण, तर तृतीय क्रमांक पुणे शहराला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशासह राज्यात सदस्य नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानात अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने सर्वाधिक महिला सदस्यांची नोंदणी करीत राज्यात अग्रक्रम मिळविला. व्दितीय पुणे ग्रामीण, तर तृतीय क्रमांक पुणे शहराला मिळाला. जिल्हाध्यक्षा छाया दंडाळे यांच्या नेतृत्वात महिलांचे सुसंवादासह सक्षमीकरण व मनोधैर्य वाढविण्यावर भर दिल्याने जिल्हा महिला काँग्रेस कमेटीचा गौरव करण्यात आला.
अखिल भारतीय महिला काँग्रेस व प्रदेश महिला काँग्रस कमेटीच्या आदेशानुसार महिला सदस्यांच्या नोंदणीसाठी ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियान राज्यासह देशात राबविण्यात आले. महिला काँंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा चारुशीला राव टोकस यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्षा छाया दंडाळे यांच्या नेतृत्वात जिल्हा महिला काँग्रस कमेटीने राज्यात सर्वाधिक नोंदणी केली. वर्धा येथे दोन आॅक्टोबर रोजी झालेल्या अखिल भारतीय महिला काँग्रसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सचिव सोनल पटेल, आशिष दुवा, तसेच प्रोजेक्ट शक्तीच्या प्रमुख आकांक्षा हिरा, प्रदेश सरचिटणीस संध्या सव्वालाखे, माजी प्रदेशध्यक्षा कमल व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूशिला राव टोकस यांनी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अद्यक्षा छाया दंडाळे व कार्यकारीणीचा गौरव केला.
जनसंवाद अभियानातही जिल्हा महिला काँगे्रस प्रथम
महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीद्वारा १ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जनसंवाद अभियान राबविण्यात आले. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून सुसंवाद साधणे, त्यांच्या समस्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा उद्देश होता. यामध्ये जिल्हा महिला काँगे्रस कमिटीने प्रथम स्थान मिळविले. अभियानासाठी प्रदेश सरचिटणीस ऊषा उताणे, माजी आमदार केवलराम काळे, भारती गावंडे, जयश्री चव्हाण, वनिता पाल, सुषमा कोकाटे, विजया सोमवंशी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.